हिंगोली - शहरातील खाकी बाबा मठ संस्थान येथे आज सकाळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या बासा पुजनाचा (Basa Pujan) कार्यक्रम धार्मिक विधीवत पुजाअर्चा करून करण्यात आला.  
मराठवाडा

हिंगोलीत सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासा पूजन

राजेश दारव्हेकर

हिंगोली : म्हैसूरच्या दसऱ्यानंतर हिंगोली येथील दसरा (Dasara In Hingoli) सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे नवरात्रात दहा दिवस रामलीला, नव्हान पारायण आदी धार्मिक कार्यक्रम असतात व रावण दहनाचा कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी प्रसिद्ध आहे. मात्र मागच्या वर्षीपासून कोरोनाचे सावट असल्याने हे सर्व कार्यक्रम रद्द करून खाकी बाबा मठात छोटेखानी कार्यक्रम होत आहेत. या वर्षी देखील येथेच कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (ता.१९) सकाळी अकरा वाजता बासापुजन कार्यक्रम झाला. शहरातील खाकी बाबा मठ संस्थान येथे आज सकाळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या बासा पुजनाचा (Basa Pujan) कार्यक्रम धार्मिक विधीवत पुजाअर्चा करून करण्यात आला. यावेळी महंत कौशल्यदास महाराज, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, प्रभारी तहसीलदार संदीप राजपुरे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तलाठी प्रदीप इंगोले, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड.पतंगे, शाम खंडेलवाल, बाबा घुगे, मनोज शर्मा, नर्सींगराव नायक, श्री.गोळेगावकर, गोविंद सारस्वत दौलत बनसोडे, गोविंद गिरी आदींची उपस्थिती होती.

शहरातील प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक दसरा महोत्सव समिती दरवर्षी रामलीला मैदानात हे कार्यक्रम होतात. दसरा महोत्सवाला औद्योगिक प्रदर्शनाची जोड दिली जाते. येथे विविध स्टाॅल्स व बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य उभारले जाते. यात मिक्की माऊस, ड्रॅगन ट्रेन, गगनचुंबी आकाश पाळणे आदी तसेच मनोरंजनासाठी देखील विविध स्टाॅल्स उभारण्यात येतात. मात्र हे सर्व कार्यक्रम कोरोना संकटाने बंद झाले आहेत. शिवाय रामलीला मैदानावर आता उद्यान उभारले आहे. त्यामुळे येथे होणार सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी प्रमाणे दसरा महोत्सवाचे सर्व धार्मिक कार्यक्रम खाकी बाबा मठात होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT