पैठणमधील 'खेर्डा'च्या सांडव्याला गळती,प्रकल्प उन्हाळ्यात कोरडा?

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : खेर्डा प्रकल्पावरील सांडव्याची सुरू असलेली गळती.
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : खेर्डा प्रकल्पावरील सांडव्याची सुरू असलेली गळती.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : खेर्डा प्रकल्पावरील (Kherda Project) सांडव्यावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे झाली होती. ती वाकोद कालवा उपविभागाच्या वतीने काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. सध्या खेर्डा प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झालेला असून सांडव्याला काही प्रमाणात गळती लागल्याने पाणी विनाकारण वाया जात असून जर गळती न थांबल्यास उन्हाळ्यात प्रकल्प कोरडा होऊन परिसरात पाणीटंचाई (Water Scarcity) निर्माण होण्याची शक्यता आहे. त्वरित पाण्याची गळती संबंधित विभागाने थांबविण्याची मागणी शेतकरी बाबासाहेब शिंदे, रामेश्वर शिंदे,अक्रुर गलधर, सोमनाथ दिलवाले, कल्याण गलधर, मच्छिंद्र पांगरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे खेर्डा प्रकल्पाची (Paithan) वितरण व्यवस्था नसतानाही मागील वर्षी बॅक वाॅटरद्वारा ५३० हेक्टरवर सिंचन झाले आहे. त्याद्वारे १ लाख ७४ हजार पाचशे रूपयांची विक्रमी पाणी पट्टी वसुली (Aurangabad) करण्यात आली आहे.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : खेर्डा प्रकल्पावरील सांडव्याची सुरू असलेली गळती.
भोकरदन तालुक्यात विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

पैठण तालुक्यातील खेर्डा प्रकल्प हा वाकोद कालवा उपविभागाच्या वतीने येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांसह विविध झाडे वाढली होती. त्यामुळे प्रकल्पावरील कामे करण्यासाठी साधा रस्ता सुद्धा राहिला नव्हता. त्यामुळे येथील झाडे झुडपे तोडणे गरजेचे असल्याने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंंता जयवंत गायकवाड, शाखा अभियंता मनोज वाघचौरे यांनी वाकोद कालवा उपविभागाच्या वतीने दहा वर्षांपासून वाढलेली काटेरी झुडपे तोडून परीसर स्वच्छ करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. तसेच खेर्डा प्रकल्प अंतर्गत मुख्य कालव्याची सहा किलोमीटरपर्यंत दुरूस्ती करण्यात आली असून छोट्या वितरकीचे कामे करणे गरजेचे आहे. त्या वितरीकाद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. तसेच सध्या खेर्डा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येत आहे. सध्या सांडव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याने पाणी गळती लागलेल्या सांडव्यादारे पाणी वाहून जात असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. तरी त्याची त्वरीत दुरूस्तीची मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : खेर्डा प्रकल्पावरील सांडव्याची सुरू असलेली गळती.
जालना: लसीकरणाला बुस्टर; जिल्ह्यात ९ लाख ७० हजार जणांना डोस

खेर्डा प्रकल्पावरील सांडव्याची गळती त्वरीत थांबणे गरजेचे आहे. बाकी असलेल्या वितरिकेचे कामे जलसंपदा विभागाने त्वरीत करावे. जेणेकरून आमच्या भागातील शेतकऱ्यांना थेट शेताजवळ पाण्याचा लाभ मिळू शकेल.

- बाबासाहेब शिंदे पाटील, प्रगतिशील शेतकरी

खेर्डा प्रकल्पावरील सांडव्याची गळती थांबविण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात मंजूरीसाठी सादर केलेला आहे. त्याची मंजुरी मिळताच प्रकल्पाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर दुरूस्ती करण्यात येईल.

- जयवंत गायकवाड, उपविभागीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com