crime sakal
मराठवाडा

Crime News: धक्कादायक! जन्मदात्या पित्याने २१ वर्षीय मुलाची गळा आवळून केली हत्या

दारू पिऊन द्यायचा त्रास, आत्महत्येचा केला बनाव

रुपेश नामदास

पारध: भोकरदन तालुक्यातील विझोरा येथे दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या मुलाचा पित्याने गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.४) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधी आत्महत्येचा बनाव करण्यात आला होता.

विझोरा येथील आदित्य गजानन आढाव (वय २१) यास दारूचे व्यसन होते. दारू प्यायल्यावर तो सतत वडील गजानन व आई संगीता यांना त्रास देत असे. त्यातच बुधवारी रात्री साडेनऊ वाजता आदित्य हा दारू पिऊन घरी आला.

त्यानंतर त्याने आई तसेच वडील गजानन येडुबा आढाव यांच्यासोबत वाद घातला. आई-वडिलांना घराबाहेर जा म्हणत धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या गजानन आढाव यांनी आदित्य याचा गळा आवळून खून केला.

तसेच आदित्यने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. प्रारंभी या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र गुरुवारी (ता. चार) आई संगीता आढाव यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर गजानन आढाव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गजानन यांना ताब्यात घेतले आहे.

भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT