Farmer Suicide esakal
मराठवाडा

शेतात जाऊन येतो असे सांगून गेलेल्या तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

दोन ते अडीच एकर शेतजमीन आहे. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे.

दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : दुष्काळ, नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे डोईजड झालेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेतुन तालुक्यातील (Bhokardan) कोपर्डा येथील एका २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या (Farmer Suicide) केली. ही घटना सोमवारी (ता.२९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रदीप दिगंबर पाबळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोपर्डा गावातील रामेश्वरनगर येथील रहिवाशी असलेल्या प्रदीप यांच्याकडे दोन ते अडीच एकर शेतजमीन आहे. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसाठी घेतलेले (Jalna) कर्ज कसे फेडणार या विवंचनेत ते सतत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान सोमवारी सकाळी शेतात जाऊन येतो असे घरच्यांना सांगून गेलेला प्रदीप उशीर झाला तरी घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्यावर कोपर्डा येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT