पालथ्या पायाचे सरकार सत्तेवर आल्याने राज्यावर संकटे : विनायक मेटे

पालकमंत्री कसा नसावा याच धनंजय मुंडे उदाहरण असल्याचा टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.
Vinayak Mete
Vinayak Meteesakal

बीड : राज्यातल्या जनतेसोबत सरकार लबाडी करित आहे. तर, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्यात सर्वच घटक अडचणीत आहेत. पालकमंत्री कसा नसावा याच धनंजय मुंडे उदाहरण असल्याचा टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे (Two Years Of Uddhav Thackeray Government) झाल्याच्या निमित्त सोमवारी (ता.२९) आमदार मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मेटे म्हणाले, त्यांचे परळीतले ‘उद्योग’ त्यांना परळीच्या बाहेर पडायला वेळ मिळू देत नाहीत. जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे इतर आमदारही त्यांना दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालू देत नसल्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळी मतदार संघाचे पालकमंत्री झाल्याचा टोलाही मेटे यांनी लगावला. सपना चौधरी, अतिक्रमण, देवस्थान जमिनी हे त्यांचे उद्योग असल्याचा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला. श्री. मुंडे यांचे शेतकरी, सर्वसामान्य अशा कुठल्याच घटकांकडे लक्ष नाही. (Beed Political News)

Vinayak Mete
'माफ करा मोदीजी तुमची सात वर्ष सेवा पाहिली'

आघाडी सरकार बनवतांना शरद पवार यांनी चांगला मुहूर्त बघितला नव्हता. म्हणूनच पालथ्या पायाचे आणि अपशकुनी सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यावर विविध संकटे आहेत. दोन वर्षांत सरकारने व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, मराठा ,ओबीसी मुस्लिम, धनगर या सर्व घटकांचा विश्वासघात केला हीच सरकाची उपलब्धी आहे. नवाब मलिक यांना त्यांचा जावाई, समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्या पुढे जाऊन समाजासाठी काम करायला वेळ नाही. ठाकरे सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली. पण कर्जमाफीही नीट दिली नाही. विश्वासघात करणे हा सरकारचा स्थायीभाव आहे. शेतकरी नागवला जात असून आधार देण्याऐवजी नितीन राऊत यांच्या माध्यमातून वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ सभागृहात घोषणा करतात.

Vinayak Mete
महाविश्वासघाती आघाडी, प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका

छगन भूजबळ, विजय वडेट्टीवार फक्त समाजाचा खोटा पुळका दाखवितात. मात्र, त्यांच्याच सरकारमुळे आरक्षण रद्द झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने शिवस्मारकासाठी दोन वर्षांत बैठकीसाठी दोन मिनिटांचाही वेळ दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com