Hingoli Crime
Hingoli Crime  Sakal
मराठवाडा

Hingoli Crime : कुलस्वामिनी पतसंस्था आर्थिक घोटाळा : संचालकांचे बँक खाते गोठविणार; गुन्हे शाखेने दिले बँकांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

Hingoli News : रेल्वे स्थानक रस्त्यावरील कुलस्वमिनी महिला अर्बन क्रेडीट पतसंस्थेतील १० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात संचालकांसह १६ आरोपींचे बँक खाते गोठविले जाणार आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांना पत्र दिले आहे.

हिंगोली शहरातील रेल्वेस्थानक रोड भागात कुलस्वामिनी महिला अर्बन क्रेडीट पतसंस्थेमार्फत ग्राहकांना आकर्षक व्याज देण्याचे दाखविले. त्यावरून ४८१० ग्राहकांनी १० कोटी ६८ हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र, पतसंस्थेच्या संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठेविदारांच्या रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने नातेवाईक,

हितसंबंधातील व्यक्तीच्या नावे ता. १६ डिसेंबर २०२२ ते ता. २९ नोव्हेंबर २३ या कालावधीत नियमबाह्य पध्दतीने विनातारण कर्ज वाटप केले. ठेवीदारांच्या १०.६८ कोटी रुपयांच्या जमा रकमेची आर्थिक फसवणुक करून अपहार केल्याचे सनदी लेखापालाच्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले.

या प्रकरणी सनदी लेखापाल संजय जाजू (नांदेड) यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षा अर्चना कैलास खर्जुले, उपाध्यक्ष त्रिवेणी धर्मेंद्र खर्जुले,

सचिव सारिका बजरंग खर्जुले, संचालिका वर्षा भारतभूषण अग्रवाल, अंजू सुधीर कटके, मीनाक्षी भगवान गुंजकर, सिया राहुल चंदनानी, बेबी प्यारेवाले, शितल मंगेश लोलगे, अलका संतोष खंदारे, गायत्री गणेश महामुने यांच्यासह कैलास जगन्नाथ खर्जुले,

बजरंग जगन्नाथ खर्जुले, पतसंस्थेचे व्यवस्थापक गणेश विद्याधरराव धोंड, पासींग अधिकारी शिरीष कांतराव जहागिरदार, रोखपाल अक्षय संतोष निलजेवार यांच्या विरुध्द ६ डिसेंबर २०२३ रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. ज्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्यासह पथकाने पतसंस्थेच्या महिला अध्यक्षा,

सचिव यासह इतर संचालक व्यवस्थापक अशा जवळपास दहा जणांना अटक केली होती त्यांना प्रारंभी पोलीस कोठडी सुनावली होती यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती तसेच यातील काही आरोपींना जमिनीवर सुटका करण्यात आली.

आर्थिक नाड्या आवळल्या

सदर प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधिक्षक एम. डी. थोरात, उपनिरीक्षक रामराव पोटे, जमादार विलास सोनवणे यांच्या पथकाने तपास सुरु केला आहे. या प्रकरणात आरोपींच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व बँकांना पत्र देऊन पतसंस्थेच्या संचालकांसह इतर आरोपींचे बँक खाते गोठविण्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार आता त्यांचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT