भूम : तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी रब्बीची ज्वारी मोडून टाकलेली दिसत आहे.  
मराठवाडा

रब्बी हंगामातील ज्वारीचेही नुकसान

सकाळ वृत्तसेवा

भूम (जि. उस्मानाबाद) : भरपावसाळ्यात दडी मारलेल्या पावसाने अंतिम टप्प्यात दमदार हजेरी लावली. परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील पाणीप्रश्‍न सुटल्याने दुष्काळाची दाहकता काहीशी कमी झाली आहे. मात्र खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कापूस या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी हंगामात पेरणी केल्यानंतर उगवण झालेल्या ज्वारीच्या पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक मोडीत काढून दुबार पेरणीची तयारी सुरू केली आहे. 


सलग पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने रब्बी हंगामासाठी हा पाऊस चांगला आहे. या पावसाच्या आधारावर हलक्‍या जमिनीवरील शेतकऱ्यांनी रब्बीतील ज्वारीची पेरणी केली होती; मात्र सततच्या पावसाने बहुतांश ठिकाणी उगवलेले ज्वारीचे पीक मोडून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. आता पाऊस थांबल्याने अनेक भागांत ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेल्या या भागातील या महत्त्वाच्या पिकाला या परतीच्या अवकाळी पावसाने बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. उशिरा का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी जोरात सुरू केली आहे. यावेळी या भागांत किती हेक्‍टरमध्ये ज्वारीची लागवड झाली आहे याची माहिती कृषी कार्यालयात नाही. बहुतांश भागात ज्वारी पिवळी पडल्याचा धोका कायम असला तरी पावसामुळे पिकाची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांनी उगवलेली ज्वारी मोडीत काढली आहे. काही भागांतील टॅंकरने होणारा पाणीपुरवठा वगळला तर पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ या दुष्टचक्रातून या पावसाने मुक्ती मिळवून दिली आहे. 
शिवाय जमिनीत भरपूर पाणी मुरल्याने रब्बी हंगामाची सोयही करून दिली आहे. 

तालुक्‍यात परतीच्या पावसाने खरिपातील पिके वाया गेल्याने त्यांचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची आकडेवारी अद्याप घेतली नाही. किती क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली व किती क्षेत्रात मोडून दुबार पेरणी केली, याची आकडेवारी उपलब्ध नाही. 
- गणेश दुरुंदे, तालुका कृषी अधिकारी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT