Murderer Attack
Murderer Attack Sakal
मराठवाडा

Beed | शेतीचा वाद विकोपाला, झोपेत असताना चुलत भावावर तलवारीने वार

वैजिनाथ जाधव

गेवराई (जि.बीड) : तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये चुलत भावाभावामध्ये शेतीच्या जुन्या वादातून पहाटे घरी झोपेत असताना चुलत भावावर तलवारीने वार केले असता एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२७) घडली आहे. तालुक्यातील सिरसदेवी येथील शेख समीर शेख अमीन (वय २५) हा आपल्या घरी झोपलेला असताना पहाटे एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ, शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे समीर शेखच्या घरी आले व त्यांनी शेतीच्या जुन्या वादाची कुरापत काढत समीर शेख याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत जाऊन तो हाणामारीपर्यंत गेला असता वरील तिघांनी समीर शेखवर तलवारीने मानेवर, पायावर , पोटावर , हातावर वार करून गंभीर जखमी केले.(Man Attack On Other Over Farm Dispute In Gevrai Of Beed)

यावेळी समीरच्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद याच्या गुडग्यावर वार झाले आहेत. तलवारीने वार करून तिघेही फरार झाले आहेत. सदरील घटना सिरसदेवी येथील बेंडकीच्या वड्या जवळील वस्तीवर घडली. जखमी समीरच्या आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजारी धावत गेले असता समीर हा जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने शेख समीर याला औरंगाबाद (Aurangabad) येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT