rain rain
मराठवाडा

Parbhani Rain: मानवत तालुक्यात पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली

तालुक्यात एकूण ७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.यामुळे सखल भागातील पिकांना याचा फटका बसणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मानवत (परभणी): Parbhani Rain: तालुक्यात बुधवारी अतिवृष्टी झाल्याने त्याप्रमाणे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने नदी काठावरील शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यात एकूण पाच हजार हेक्टरी वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तालुक्यात बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून पासून मुसळधार पाऊस झाला.यामुळे ओढे नाले भरभरून वाहिले. तालुक्यात एकूण ७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.यामुळे सखल भागातील पिकांना याचा फटका बसणार आहे.

तालुक्यातील गोगलगाव, मगर सावंगी, इरळद, मंगरूळ (पा.प.),नरळद, नीलवर्ण टाकळी, कोथाळा, पार्डी शेवडी जहांगीर या नऊ गावाच्या शिवारातुन दुधना नदी वाहते. साधारणपणे तालुक्यांची १२ किलोमीटर लांबीचे दुधना नदी आहे. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून निम्न दुधना प्रकल्पातुन १२ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदी पात्रातील पाणी नदी काठच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नऊ गावातील अंदाजे ३ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहे. त्याप्रमाणे अन्य क्षेत्रातील सखल भागातील अंदाजे २ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.तालुक्यातील एकूण पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी वर्गातून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.

या गावांचा तुटला संपर्क
तालुक्यातील मगर सावंगी येथील ओढ्याला पूर आल्याने बुधवारी रात्री बंद पडलेली रहदारी गुरुवारी सुरू झाली. मानवत रोड -वालुर या मार्गावरील इरळद येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक दिवसभर बंद राहिली. सोमठाणा येथील धरमुडी या नदीला पूर आल्याने सोमठाणा, आटोळा ,राजुरा, नरळद कोथाळा येथील रहदारी गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद होती. टाकळी निलवर्ण गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी दिवसभर टाकळी निलवर्ण या गावाचा संपर्क तुटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT