heavy rain
heavy rainheavy rain

Rain Updates: निम्म्या मराठवाड्याला पावसाने झोडपले

परभणी जिल्ह्यात बुधवारपासून (ता.२१) पावसाची संततधार सुरू असून आज पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता

औरंगाबाद: Heavy rain in Marathwada: मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांना पावसाने झोडपले. बुधवारी झालेला संततधार, रात्री वाढलेला जोर आणि आजही दमदार पाऊस झाल्याने अनेक शेतांत पवसाचे पाणी साचले. नाले, ओढ्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
औरंगाबाद शहरात काल सरींवर सरी कोसळल्यानंतर आज ढगाळ वातावरण होते. तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी-
परभणी जिल्ह्यात बुधवारपासून (ता.२१) पावसाची संततधार सुरू असून आज पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारपर्यंत सरासरी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नऊपैकी सहा तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात परभणी, पाथरी, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, मानवत तालुक्यांचा समावेश आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
तालुकानिहाय गेल्या २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असाः परभणी ७६.६, गंगाखेड ५१.७, पाथरी ७५.०, जिंतूर ७१.४, पूर्णा ७०.९, पालम ६५.६, सेलू ८३.२, सोनपेठ ४३.८, मानवत ७९.६.

heavy rain
Corona Vaccination: औरंगाबादमध्ये ग्रामीण भागात लसीकरणाला ब्रेक

‘निम्न दुधना’चे बारा दरवाजे उघडले-
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा ८४ टक्यांपेक्षा अधिक झाल्याने आज सकाळी १२ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्याचा फटका दुधनालगत असलेल्या गावांना बसला आहे. परभणी - जिंतूर रस्त्यावरील करपरा नदीस बोरी गावाजवळ मोठा पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पालम तालुक्यातील १२ ते १४ गावांचा संपर्क तुटला होता.

विष्णुपुरीचे सहा दरवाजे खुले-
नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे आज उघडून गोदोवरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा प्रकल्प याआधीच भरला असून पाण्याची आवक वाढताच विसर्ग केला जातो.

कयाधू नदी दुथडी-
हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. आज सकाळी दहापर्यंत ती सुरूच होती. नाले, ओढ्यांना पूर आला. कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर दरम्यानच्या ओढ्याला पूर आल्याने पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, गत चोवीस तासांत सरासरी ४२.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असाः हिंगोली ४२.४०, कळमनुरी ३७ ५०, वसमत ४५.७०, औंढा नागनाथ ४१.२०, सेनगाव ४५.२०. आतापर्यंत जिल्ह्यात ६६ टक्के पाऊस झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात एक जूनपासून ६४.३९६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

heavy rain
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

नांदेडमध्ये दमदार-
नांदेड शहर आणि जिल्ह्यात आजही दमदार पाऊस झाला. देगलूर तालुक्यातील वनाळी ते सुगाव दरम्यानच्या ओढ्याला पूर आल्याने पाच ते सहा गांवांचा संपर्क तुटला. दोन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोहा तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्यामुळे सावरगाव, बेरळी, डोंगरगाव, रामाची वाडी येथील संपर्क तुटला आहे. किनवट तालुक्यातील सहाही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

युवक वाहून गेला-
चारा आणण्यासाठी जात असताना बाबाराव सीताराम गवाले (वय २५) हा तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेला. कामजळगा (ता. मुखेड) येथे सकाळी ही घटना घडली. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी दिली.

heavy rain
Corona Vaccination: औरंगाबादमध्ये ग्रामीण भागात लसीकरणाला ब्रेक

जालनाः १५ मंडळांत अतिवृष्टी-
जालना शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आज सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत सरासरी ५०.९० पाऊस झाला. पंधरा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये असा ः तळणी (ता. मंठा) १२५.८, घनसावंगी १०१.३, राजीउंचेगाव १०४.३, तीर्थपुरी ६६.५, कुंभार पिंपळगाव ७७, अंतरवाली ७८.३, रांजणी ७४.५, जाबसमर्थ ७२.५, जालना ग्रामीण ६९.३, रामनगर ६५.३, पाचनवडगाव ८३, परतूर ७३.५, श्रीष्टी ७८.५, सातोना ७८, मंठा ७०. घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com