माजलगाव - शहरातील राजस्थानी स्मशानभूमीत सोमवारी भारती व ज्ञानेश्वर यांचा पार पडलेला विवाह.
माजलगाव - शहरातील राजस्थानी स्मशानभूमीत सोमवारी भारती व ज्ञानेश्वर यांचा पार पडलेला विवाह. 
मराठवाडा

...अन्‌ स्मशानभूमीतच सनईचे सूर

कमलेश जाब्रस

माजलगाव (बीड) - घरी अठरा विश्वे दारिद्र्य, कुटुंबात चार मुली. मोठ्या मुलीचे लग्न ठरले; परंतु हलाखीची परिस्थिती असल्याने गायकवाड कुटुंबीयांना मुलीचा विवाह चक्क राजस्थानी स्मशानभूमीतच करावा लागला. या वेळी स्मशानभूमीत सनईचे सूर निनादले. हा आगळावेगळा विवाह माजलगावात सोमवारी (ता. २५) पार पडला.

शहरातील राजस्थानी स्मशानभूमीत गंगाधर गणपत गायकवाड राहतात. या स्मशानभूमीला राजस्थानी वैकुंठधाम नाव दिलेले आहे. स्मशानभूमीतच हे कुटुंब वास्तव्यास आहे. गंगाधर गायकवाड यांना चार मुली आहेत. मोठी मुलगी भारतीचे लग्न ताडकळस येथील व्यंकटराव पवार यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर यांच्यासोबत ठरले. लग्नाचा मुहूर्त सोमवारचा ठरला. मंगल कार्यालयात लग्न करणे शक्‍यच नव्हते म्हणून त्यांनी राजस्थानी स्मशानभूमीत हे लग्न करण्याचा निर्णय घेतला. माजलगावमध्ये प्रथमच स्मशानभूमीत हा शुभविवाह झाला. 

...यांनी दिला मदतीचा हात
विवाह सोहळ्याला ब्युटी पार्लर संघटनेच्या अध्यक्षा जान्हवी जाधव, शोभा वर्मा, नगरसेविका राजश्री मुंदडा, कांचन अकोलकर, मालती राऊळ, मीनाक्षी मोराळे, तृप्ती काटकर, वैशाली रिंगणे, वैशाली औटे, पूजा गिरी, रूपाली भोगावकर, अर्चना जाधव, कोमल वर्मा, अनिता चांडक, अर्चना बोरा यांनी संसारोपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला.

कसले मंगल कार्यालय अन्‌ कसली रोषणाई. आम्हाला स्मशानभूमीच सर्व काही...घरची परिस्थिती तशी जेमतेमच आहे. कमाईचे साधन तसे तुटपुंजेच. समाजातील दानशुरांच्या सहकार्यामुळे भारतीचे लग्न थाटात झाले. 
- गंगाधर गायकवाड, वधुपिता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: CM शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, इंटरेस्टिंग...

T20 World Cup 2024 : भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा पत्ता कट... 'ही' जोडी करणार ओपनिंग? वर्ल्ड कपपूर्वी भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Jitendra Awhad: ''स्टंटबाजी करताना जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला''; अजित पवार गट आक्रमक

World Record : रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला, अवघ्या १५ तासात पोहोचली शिखरावर

SCROLL FOR NEXT