file photo 
मराठवाडा

नांदेडला पायी किंवा गुपचुप येणाऱ्यांवर ठेवावे लागणार लक्ष

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही. पायी किंवा गुपचूप येणाऱ्या नागरिकांवर ठेवावे लागणार लक्ष. जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या प्रवाशांची संख्या ७३ हजार ६७९ एवढी असून त्यांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अजूनही काही जण छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रयत्न करत असून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन ५०३ तर क्वारंटाईन कालावधी पूर्ण १४० जणांचे झाले आहे. निरीक्षणाखाली असलेले ४३ पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ३९ जण आहेत. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले ५०३ जण आहेत. बुधवारी (ता. १५) तपासणीसाठी ४२ जणांचे नमुने घेतले. एकुण २७४ नमुने तपासणीपैकी निगेटीव्ह २२६ तर नमुने तपासणी अहवाल बाकी ४३ जणांचा असून नाकारण्यात आलेले नमुने पाच आहेत.

७३ हजार ६७९ जिल्ह्यात आले
नांदेड शहर व जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकुण प्रवासी ७३ हजार ६७९ असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. अजूनही बाहेर राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात आता प्रशासनाला दक्ष रहावे लागणार आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण यांच्यामार्फतच एखादा कोरोनाचा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पायी येणाऱ्यांवर ठेवावे लागणार लक्ष
सध्या लॉकडाऊन वाढविण्यात आल्यामुळे काही जण दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांची आपआपल्या जिल्ह्यात गावी येण्याची धडपड सुरु आहे. रेल्वे, बससेवा सर्व बंद आहेत. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या वाहनाने किंवा दुचाकीवर येण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. त्यात काही यशस्वीही होत आहेत. एवढेच नाही तर काही जण मजल दरमजल करत पायी येत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. 

जिल्ह्याच्या सीमांवर हवे विशेष लक्ष
मराठवाड्यात नांदेड आणि परभणी वगळता इतर जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्याचबरोबर नांदेड लगत असलेल्या तेलंगणा राज्यातही रुग्ण आढळले. आज गुरुवारी परभणी जिल्ह्यातही एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आता नांदेड जिल्हा प्रशासनाला आधिक सतर्क रहावे लागणार आहे. जिल्ह्याच्या सीमांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. पायी किंवा गुपचुप जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. नागरिकांनी देखील आपल्या आजूबाजूला किंवा शेजारी नवीन नागरिक किंवा व्यक्ती आलेला दिसला तर तत्काळ प्रशासनाला कळवावे जेणेकरुन संबंधितांची आरोग्य तपासणी करता येईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT