tax tax
मराठवाडा

नांदेड महापालिकेसमोर मालमत्ता करवसुलीचे आव्हान, थकबाकीदारांवर होणार कारवाई?

महापालिका हद्दीतील मालमत्ता कर वसुलीसंदर्भात आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला

अभय कुळकजाईकर

नांदेड: कोरोना संसर्गाचा फटका बसल्यामुळे गेल्या सव्वा वर्षात नांदेड वाघाळा महापालिकेला मालमत्ता कर वसुली करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल दोनशे कोटीहून अधिक करवसुलीचे उद्दिष्ट असून त्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नियोजन केले असून बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिका हद्दीतील मालमत्ता कर वसुलीसंदर्भात आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे मालमत्ता करासह पाणीपट्टी व इतर करांची वसुली कमी झाली. त्यामुळे त्याचा परिणाम इतर कामांवर झाला आहे. उद्दिष्टापेक्षा कमी वसुली झाल्यामुळे याबाबत मालमत्ता कर विभागातील अधिकारी, विभागप्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

मालमत्ता कराचे वर्गीकरण, कराची चालू मागणी, मागील थकबाकी, शास्ती, आत्तापर्यंतची झालेली वसुली तसेच रिकामे भुखंड आदींबाबत चर्चा करण्यात आली. विविध भागातील मालमत्ताधारकांकडे जवळपास दोनशे कोटीहून अधिक चालू मागणी आणि थकबाकी असल्याचे आढळून आले. महापालिकेचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असल्यामुळे या वसुलीसाठी आत्तापासून नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. लहाने यांनी दिल्या.

अशी आहे मालमत्ता कराची आकडेवारी...

- एकूण मालमत्ताधारक - एक लाख २२ हजार

- एकूण थकबाकी दंडासह - १५४ कोटी

- २०२१ - २२ चालू वर्षाची मागणी - ६० कोटी

- २०१८ - १९ मध्ये वसुली - ४८ कोटी ५९ लाख

- २०१९ - २० मध्ये वसुली - ४५ कोटी ४६ लाख

- २०२० - २१ मध्ये वसुली - ४२ कोटी २६ लाख

थकबाकीदारांवर होणार कारवाई

महापालिकेचा शासकीय, निमशासकीय तसेच इतर अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर कर थकलेला आहे. त्यामुळे तो वसुल करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून सहाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या थकबाकीदारांना नोटीसाही देण्यात आल्या असून नियमानुसार थकबाकी वेळेत भरली नाही तर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, नांदेड वाघाळा महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT