Dhananjay Munde 
मराठवाडा

Dhananjay Munde News : जर २००९ ला संधी मिळाली असती तर…; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली खंत

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा फैरी झडत राहातात. दरम्यान तुम्ही जर मला २०१९ ला निवडून दिलं असतं तर वेगळं चित्र असतं असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, त्यांच्या या वक्तव्याला आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासोबतच धनंजय मुंडे यांनी परळीत मतदारसंघातल्या जनतेसमोर त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे सभेत बोलताना म्हणाले की, माझं दुर्दैव मला जर या मतदारसंधात २००९ साली संधी मिळाली असूत तर आज जे तुम्ही बघताय ते १५ वर्षांपूर्वी तुम्हाला पाहायला मिळालं असतं.

आज महाराष्ट्रात विकासामध्ये नंबर एकचा मतदारसंघ म्हणून ज्या इस्लामपूरचं, बारामतीचं नाव घेतलं जातं. कदाचित २००९ पासून मला संधी मिळाली असती तर आपण सुध्दा इस्लामपूर, बारामतीच्या बरोबरीने परळी वैजनाथ या मतदारसंघाचा विकास झाल्याचं आपण पाहिलं असतं असे धनंजय मुंडे म्हणाले. ते परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मी अनेक संकटातून गेलो, माझ्याएवढा संघर्ष कुणीच पाहिला नसेल. २०१२ ला मला खलनायकाच्या भूमिकेत आणलं गेलं. सगळ्यांचा पराभव झाला. २०१७ ला इथला प्रतिनिधीचं राज्यात मंत्री असताना तसेच राज्यात आणि केंद्रात सरकार असताना आपण परळी तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषदेच्या जागा निवडूण आणून दाखवल्या. जे पडले त्यांना आगोदर विजयाचा गुलाल लावला आणि त्यानंतर २०१९ ला मला गुलाल लागला असेही धनंजय मुंड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT