फोटो 
मराठवाडा

नांदेडच्या लोकअदालीतून पावणेनऊ कोटींची तडजोड

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी (ता. आठ) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत जिल्हाभरातून तीन हजार ४३५ प्रकरणे सामोपचाराने मिटवून आठ कोटी ७८ लाख २८ हजार ७३० रुपयाची तडजोड करण्यात आली. 

यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकिल सदस्य तसेच पॅनल सदस्य व सर्व सन्माननिय विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा त्या- त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. 

साडेचार हजार प्रकरणे निकाली

जिल्ह्यामध्ये एकुण तीन हजार ४३५ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. त्यातून आठ कोटी ७८ लाख २८ हजार ७३० रूपये इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननिय विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड. व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक वकर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे प्रयत्न

जिल्हा न्यायाधीश (तिसरे) एम. आर. मांडवगडे यांचे पॅनलवरील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालयातील दिवाणी अपील क्र. 91/15 सुभाष विरूध्द विजय रिजवानी यांच्यात मालमत्ता प्रकरणी दिपक धोळकिया व न्यायाधीश एम. आर. मांडवगडे यांनी विशेष प्रयत्न करून सामोपचाराने मध्यस्थीव्दारे प्रकरण निकाली काढले. सदर प्रकरणातील प्रतीवादी यास विशेष प्रयत्न करून आजारी असतांना त्यांना रूग्णवाहीकेव्दारे न्यायालयात दाखल करून प्रकरण मिटवण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्याकरिता व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याकरिता प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया आणि सचीव तथा न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

King Cobra in Sindhudurg : कोकणात 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित मार्गावर आढळला 7 फुटी 'किंग कोब्रा'; तळकटच्या जंगलात पिलांचाही वावर असण्याची शक्यता

Mumbai : ४८ वर्षांपूर्वी ५० हजारात ठरलेला व्यवहार, वाद कोर्टात पोहोचला; महिलेला मिळाला घराचा ताबा, २५ लाख रुपये द्यावे लागणार

Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात फास्टॅग बिघाड; टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

29 वर्षाचे रजनीकांत 16 वर्षांच्या अभिनेत्रीशी करणार होते लग्न; ‘त्या’ एका अपशकुनामुळे तुटली स्वप्नांची दोरी!

SCROLL FOR NEXT