OBC Reservation Andolan OBC leader Laxman Hake esakal
मराठवाडा

OBC Andolan : लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ मुंबईला चर्चेसाठी जाणार नाही; ओबीसी समितीच्या बैठकीत मोठा निर्णय

वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण (OBC Reservation Andolan) बचावासाठी गेल्या सहा दिवसांपासून हाके व वाघमारे आमरण उपोषण करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने सरकारसोबत चर्चेसाठी कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचा निर्णय घेतला.

अंकुशनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (OBC leader Laxman Hake) यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपले कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचे सांगितले आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Meeting) मंत्र्यांनी ओबीसींबाबत आपण 12 कोटी जनतेच प्रतिनिधित्व करत आहोत या भावनेनं वागावं, असा सल्ला हाके यांनी सरकारला दिला आहे. आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण (OBC Reservation Andolan) बचावासाठी गेल्या सहा दिवसांपासून हाके व वाघमारे आमरण उपोषण करत आहेत. उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाने येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आपण चर्चेसाठी यावे, असे मत व्यक्त केले. या दरम्यान आमचे शिष्टमंडळ पाठवू, असे हाके यांनी सांगितले होते.

मात्र, वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने सरकारसोबत चर्चेसाठी कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचा निर्णय घेतला. यामुळे आमचे शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार नाही, असे हाके यांनी सांगितले. आमचे हक्क आणि अधिकार कसे बाधित होत नाही हे शासनाने सांगावे, असेही हाके यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT