OBC Reservation Andolan Laxman Hake
OBC Reservation Andolan Laxman Hakeesakal

'OBC आरक्षणाबाबत उद्याच कॅबिनेट बैठकीत चर्चा'; सरकारच्या शिष्टमंडळाचं आंदोनकर्त्या लक्ष्मण हाकेंना मोठं आश्वासन

ओबीसी नेते हाके, सहकारी नवनाथ वाघमारे हे ओबीसी बचाव आरक्षणासाठी (OBC Reservation) वडीगोद्री येथे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत.
Published on
Summary

जरांगे महाराष्ट्रात गेल्या सात-आठ महिने सांगत आहेत की, ओबीसी आमचा भाऊ आहे. आमच्यात भाईचारा आहे. मग, ते ओबीसी नेत्यांना टार्गेट का करताहेत?

अंकुशनगर : आम्ही उद्याच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा करून मार्ग काढू. या चर्चेसाठी उद्या तुमचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, असं आश्वासन देऊन शिष्टमंडळाकडून लक्ष्मण हाके (laxman Hake) व सहकारी नवनाथ वाघमारे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे हाके यांनी सांगितले. यामुळे सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरलीये.

OBC Reservation Andolan Laxman Hake
खोटी कागदपत्रं देऊन 'बँक ऑफ इंडिया'ची 61 कोटी 15 लाखांची फसवणूक; भाजपच्या 'या' बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

ओबीसी नेते हाके, सहकारी नवनाथ वाघमारे हे ओबीसी बचाव आरक्षणासाठी (OBC Reservation) वडीगोद्री येथे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत. यांना भेटण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad), नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट घेऊन चर्चा केली.

शिष्टमंडळाचं मत असं होतं की, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपोषण सोडून आम्ही यावं, बोगस कुणबीद्वारे जरांगे म्हणतात की आम्ही 80 टक्के मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवलं आहे, याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. ओबीसींना हक्क-अधिकार नाही का? सरकार फक्त ठराविक वर्गाचं आहे का? असा सवाल हाके यांनी सरकारला केला.

OBC Reservation Andolan Laxman Hake
अण्‍णासाहेब पाटील महामंडळाच्या 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; नरेंद्र पाटील संतप्त, मुख्‍यमंत्र्यांना विचारणार जाब

जरांगे महाराष्ट्रात गेल्या सात-आठ महिने सांगत आहेत की, ओबीसी आमचा भाऊ आहे. आमच्यात भाईचारा आहे आणि ओबीसी नेत्यांना ते टार्गेट करताना दिसतात. ओबीसी भाऊ आहे, तर त्या सामाजिक मागासवर्गीय लोकांचे हक्काने अधिकार हिरावून घेताना, त्यांचं घर उध्वस्त करताना, त्यांच्या छोट्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना ओबीसी तुमचा मित्र कसा असू शकतो? जरांगेंना शासनामार्फत रेड कार्पेट आथरलं जातं, असा आरोपही हाके यांनी केला आहे. यावेळी वडीगोद्री येथे राज्यभरातून मोठा जनसमूदाय ओबीसी आरक्षण बचावाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.