पंकजा मुंडे 
मराठवाडा

दसऱ्याला भगवानगडावर मी येणार, तुम्हीही या; पंकजा मुंडेंची साद

सकाळ वृत्तसेवा

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा जपायची आहे. अखेरपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगडावर मी येणार आहे, तुम्हीही या, अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी रविवारी (ता. २६) संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी सावरगाव घाट (Sawargaon Ghat) (ता. पाटोदा) येथे घातली. पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांचे दर्शन घेतले. तसेच मेळावा मैदानाची पाहणी केली. दसरा हा स्वाभिमानाचा दिवस आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम दरवर्षी यादिवशी इथे होत असतो. थकत नाही (Beed) आणि रूकत नाही, असा वारसा तुमच्यामुळे मला मिळाला आहे, तुमच्या जिवावरच मी लढू शकते, संघर्ष करू शकते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मध्यंतरी पाणी टंचाईमुळे मंदिर व सुशोभीकरणाचे काम करता आले नाही. परंतु, हे सर्व कामे पूर्ण करून सुंदर मंदिराचे काम देखील पूर्ण करू, असेही त्या म्हणाल्या.

ऊसतोड कामगार हा माझा कधीच राजकारणाचा विषय नव्हता. श्रेयासाठी कधी मी काम केले नाही. लोकनेते मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांचे महामंडळ आपण सत्तेत असताना स्थापन झाले, ते काम आता पूर्णत्वास आले आहे. हे महामंडळ आता सामाजिक न्याय विभागाकडे आहे, ऊसतोड कामगारांनी जास्तीत-जास्त नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

हनुमान गडालाही भेट, पेढेतुला

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी श्रीक्षेत्र हनुमान गड येथेही भेट दिली. त्यांची वाजत- गाजत पेढेतुला करण्यात आली. मठाधिपती बुवा महाराज खाडे व बाळासाहेब खेडकर यांनी त्यांचे स्वागत केले. जागोजागी रांगोळ्याची आरास व पुष्पमालांनी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार भीमसेन धोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राजाभाऊ मुंडे, संदेश सानप, सभापती सुवर्णा लांबरूड, राम सानप आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT