file photo 
मराठवाडा

साईबाबांच्या नंतर आता संत जनाबाईंसाठी  जनआंदोलन !

अनिल शेटे

गंगाखेड (जि. परभणी)  : संत साईबाबा यांची जन्मभुमी पाथरीसाठी जिल्हावासीयांनी नुकतेच आंदोलन केले. आता संत जनाबाईंसाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान,  पाथरीच्या धरतीवरी गंगाखेड येथील संत जनाबाईचे जन्मस्थळ तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र म्हणून जाहीर करून या विकासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात यावा. यासाठी जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संत जनाबाई मंदिर संस्थेचे सक्रीय सदस्य मनोहर महाराज केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील संत जनाबाई मंदिरात बुधवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता वारकरी संप्रदायायातील महाराज तसेच संत जनाबाई मंदिर संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.
पुढे बोलताना मनोहर महाराज केंद्रे म्हणाले, ‘‘गंगाखेड शहर हे प्रति दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. शहराला पुरातन काळापासून धार्मिक महत्त्व  आहे. राज्य, परराज्यांतून गोदावरी नदीवर धार्मिक विधी करण्यासाठी भाविक येतात. काशिनाथ महाराज यांचे समाधी स्थळ, यज्ञमहर्षी रंगनाथ महाराज सेलूकर याची कर्मभूमी, स्वंयभू चिंतामणी मंदिर, तिरुपती समान बालाजी मंदिर अशी अनेक देवस्थाने आहेत. संत जनाबाई जन्मस्थळ गंगाखेड असून या भूमीचा विकास करण्यासाठी सरकारचे धोरण उदासीन आहे. 

संत जनाबाई यांचे जगभर भाविक

संत जनाबाई यांचे जगभर भाविक वर्ग आहे. जिल्हातील नर्सी संत नामदेव याची जन्मभूमी आणि पाथरीत साईबाबांची जन्मभूमीला सरकारने निधी उपलब्ध करून दिला. याच धर्तीवर संत जनाबाई जन्मभूमीला तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी निधी देण्यात यावा. गंगाखेडच्या या विकासासाठी शासनाने ता.२० फेब्रुवारीपर्यंत निधीची घोषणा करावी. अन्यथा कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय, तालुकावासीय, तसेच सर्व क्षेत्रातील मंडळी जनआंदोलन छेडणार आहेत.’
या पत्रकार परिषदेत संत जनाबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. संतोष मुंढे, बालासाहेब पारवे, विनायक महाराज गुट्टे, मानिक महाराज नाव्हेकर, दिलीप महाराज इसादकर, रामराव महाराज, सूर्यभान महाराज यांच्यासह पालम, सोनपेठ, गंगाखेड येथील कीर्तनकारांची उपस्थिती होती.

हेही वाचा - दोन लाखांचे दागिने परत करुन माणुसकीचे घडविले दर्शन ​

कृती समिती गठित करण्यात येणार
या आंदोलनासाठी कृती समिती ता.२० फेब्रुवारी गठित करण्यात येणार आहे. त्यानंतर उपविभागीय महसूल कार्यालयात निवेदन, विधी मंडळ अधिवेशनावर भजन आंदोलन काढण्यात येणार आहे. गंगाखेड तहसिल कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात करण्यात येणार आहे. या आंदोलानाची तारीख, दिशा, नियोजन ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत मनोहर महाराज केंद्रे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पुण्यात हवाई दलाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Yavatmal: पोलिस अधिकार्‍यांच्या विभागीय बदल्या; काही बदल्यांना स्थगिती; पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश

SCROLL FOR NEXT