Trupti Desai News 
मराठवाडा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी लढणार : तृप्ती देसाई

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शनिवारी (ता.२०) दुपारी पुजा चव्हाणच्या वसंतनगर तंड्यावरील घरी भेट दिल्यानंतर केली आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेले पुजा चव्हाण प्रकरण. या प्रकरणाला दोन आठवडे झाले तरी अजून गुन्हा दाखल झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी दोघांना अटक केल्याची चर्चा आहे. तालुक्यातील वसंतनगर तंड्यावरील पुजा चव्हाण हिच्या घरी शनिवारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तिचे वडील लहू चव्हाण यांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले की, पुजाला न्याय मिळाला पाहिजे. राज्याचा मंत्री असा एवढे दिवस गायब कसा होवू शकतो. पुजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. व पुजाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. पुजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी  लढणार असल्याचे श्रीमती देसाई यांनी यावेळी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT