nilanga  sakal
मराठवाडा

Rain News : कासारसिरसी महसूल मंडळात मुसळधार पाऊस,उस्तुरी ओढ्याला पूर, सोयाबीनला जिवदान

हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता

राम काळगे

निलंगा - निलंगा तालुक्यातील कासारसिरसी महसूल मंडळात शनिवारी ता. २३ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उस्तूरी ता. निलंगा येथील ओढ्याला पूर आला असून या पावसामुळे खरिप पिकांना कांही प्रमाणात जिवदान मिळाले आहे. अन्य चार महसूल मंडळातही चांगला पाऊस झाला आहे.

निलंगा शहरासह ग्रामीण भागातील कांही महसूल मंडळात चांगला पाऊस झाला असून कासारसिरसी महसूल मंडळात मोठा पाऊस झाला एकूण दहा महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली असली तरी निटूर व पानचिंचोली महसूल मंडळात मात्र पाऊस झाला नाही.

हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. तालुक्यातील कासारसिरसी, निलंगा, कासारबालकुंदा, भुतमुगळी, मदनसुरी, आंबुलगा-बु, औरादशहाजानी यासह आदी महसूल मंडाळात मोठा पाऊस झाला आहे. गेल्या कांही दिवसापासून तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली होती आक्टोबर महीना पूर्णतः निरंक गेल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर या सर्वाधिक पेरा असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

अद्यापही तालुक्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला असून पावसाळ्याचे दिवस संपत आले असले तरी पाऊस पडेल की नाही अशी साशंकता शेतकऱ्यांना लागली आहे. तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी अतिशय कमी असून बडूर, केदारपूर, निलंगा, लांबोटा, शेडोळ, कासारबालकुंदा यासह आदी लघू प्रकल्पात पाणीसाठा नाही शिवाय मांजरा व तेरणा या दोन्ही नद्या अजूनही कोरड्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे.

तालुक्यातील एकुण दहा महसूल मंडळापैकी कासारसिरसी महसूल मंडळात ६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर निलंगा- ३५ मी.मी, कासारबालकुंदा - ४० मी.मी, मदनसुरी- ४८ मी.मी, हलगरा- २८ मी.मी, आंबुलगा- १८ मी.मी, भुतमुगळी- ३७ मी.मी तर पानचिंचोली ५ मी.मी, निटूर ५ मी.मी, औरादशहाजानी १८ मी.मी. असा महसूल मंडळात पाऊस झाला आहे. तालुक्याला आणखी मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Crime: विमा योजना संपली, पैसे मिळणार सांगून गंडा; वाघोलीतील व्यक्तीला ४० लाखांचा ऑनलाइन चुना

Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

SCROLL FOR NEXT