Solapur : सातबारामधील पुनर्वसनचा शेरा कमी करण्यास टाळाटाळ, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

याबाबतचे निवेदन जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले असून
solapur
solapur sakal

मंगळवेढा- उजनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित झालेल्या जमिनीचे वाटप होऊन देखील इतर क्षेत्रावरील शेरा कमी करण्यासाठी पुनर्वसन व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळाटाळ होत आहे.सदरचा शेरा कमी करावा अन्यथा तीन ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यासमवेत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला.

याबाबतचे निवेदन जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवेढा येथील गट नंबर 103 या गटाचे एकूण क्षेत्र 11 एकर पैकी 4 एकर जमीन उजनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित होऊन त्या धरणग्रस्तांना वाटप झाले तरी देखील महसूल खात्याच्या बेजबाबदारपणामुळे त्या गटातील शिल्लक क्षेत्र 7 एकर याच्या वरती उजनी पुनर्वसनासाठी काढून घेण्याचे ठरले आहे .

असा सातबारा पत्रकी पेन्सिल शेरा अद्याप पर्यंत तसाच आहे तो शेरा कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे सर्व कागदपत्रे जोडून पत्र व्यवहार केला.तहसीलदार मंगळवेढा यांनी संपूर्ण प्रकरणाची तलाठी यांच्यामार्फत चौकशी केली असता. सदरचा शेरा हा पेन्सिलने लिहिला असल्याचे दिसून येते .

solapur
Pune Dam Water Level : खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस; चार धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा

सर्व सातबारा व फेरफार याची पाहणी केली असता सदरचा शेरा कोणत्याही फेरफार क्रमांकाने आलेला दिसून येत नाही असा अहवाल पुनर्वसन अधिकारी सोलापूर यांना पाठवून एक वर्ष झाले. तरी देखील अद्याप पर्यंत पुनर्वसन विभाग व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळे बाधीत शेतकरी हेलपाट्याने त्रस्त झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी व तात्काळ त्या गटावरील पेन्सिल शेरा कमी करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली यावेळी त्यांच्यासमवेत बापूसाहेब कलुबर्मे काका दत्तु रवी गोवे आधी उपस्थित होते.

solapur
Solapur News : रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com