Nanded News 
मराठवाडा

Video : आठवडे बाजारावर ‘कोरोना’चे सावट- कुठे ते वाचा 

नवनाथ येवले

नांदेड : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह कोचिंग क्लासेस, स्विमींग पूल, चित्रपटगृहांसह लग्न, सभांवर निर्बंध जारी केले आहेत. राज्यभरात आपत्ती व्यवसथापन कायदा लागू करण्यात आल्याने आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत. शहरातील जुना मोंढा आठवडे बाजारात रविवारी (ता.१५) शुकशुकाट दिसून आला. ग्रामीण भागातून आलेल्या भाजी विक्रेत्यांना ग्राहकांअभावी नुकसानीला सामोरे जावे लगले तर शेतकऱ्यांनी खर्चही निघत नसल्याची खंत व्यक्त केली. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात आपत्ती व्यवसथापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जागृती व दक्षताच्या सूचना देण्यात येत आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपीषद कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांसह चित्रपटगृह, स्वीमींगपुल मंगळवार (ता. ३१) पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जमावबंदी आदेशा लागू करण्यात आल्याने जिल्ह्यातील नियोजित सभा, व्याख्यानांसह सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मंदिर, मशिदीतील धार्मिक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या शिवाय लग्न समारंभावरही निर्बंध जारी करण्यात आले असून मंगल कार्यालय चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आठवडे बाजार प्रतिबंधित करण्यात आल्याने रविवारी शहरातील जुनामोंढा परिसरात महापालिका प्रशासनाने मंगळवार (ता. ३१) पर्यंत आठवडे बाजार बंद राहण्याच्या सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या आहेत.

ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील आठवडे बाजारांवर शनिवारी (ता. १४) प्रतिबंध जारी करण्यात आला. पण रविवारी (ता. १५) ग्रामीण भागातून शेतकरी, व्यवसायिक, व्यापारी फळ- भाजी विक्रीसाठी जुना मोंढा परिसरात दाखल झाले. महापालिका प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू करताच शेतकरी, व्यापाऱ्यांनी आम्ही विक्रीसाठी आणलेल्या मालाचे काय करायचे, आधीच खेरदीसाठी ग्राहक बाजाराकडे फिरकत नसल्याची चिंता व्यक्त करत ऐनवेळी दिलेले बाजार बंदचे निर्देश सोमवार (ता.१६) पासुन लागू करण्याची मागणी केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सोमवार (ता. १६) पासून शहरातील आठवडे बाजार बंद राहण्याच्या सूचना दिल्या. 

येथे क्लिक कराPHOTOS : कशामुळे वाढतेय थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी
 
डोंगरा एवढ्या समस्येला तोंड द्याचे कसे
कोरोनाच्या धास्तीने नागरिकांनी आठवडे बाजारांकडे पाठ फिरविल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. पदरमोड करून ग्रामीण भागातून खरेदी केलेल्या मालातून खर्चाचीही बरोबरी होत नाही. त्यातच शिल्लक मालाचे नुकसान होत असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. शेतातील फळ- भाजीपाला वेळेत विक्रीसाठी बाजारात आणावा लागतो. त्यामुळे बाजारात मिळेल त्या भावात विक्री करावे लागते. आठवडाभरापासून शहरातील आठवडा बाजाराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने एकीकडे काढणीअभावी शेतात तर दूसरीकडे भाव घसरल्याने बाजारात अशा दुहीरी नुकसानीला तोंड द्यावी लागत आहे. त्यातच आता आठवडे बाजार बंदचे निर्देश देण्यात आल्याने नुकसानीची डोंगरा एवढी समस्या निर्माण झाल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT