file photo 
मराठवाडा

दरोडाप्रकरणातील टोळी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

परभणी : गंगाखेड, लोणावळा आदी शहरात चोरी, दरोडा आदी प्रकरणातील टोळीस स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.आठ) ताब्यात घेतले आहे. पकडलेले आरोपींनी दैठणा येथील बॅंक फोडण्याचा प्रयत्न केला होता.

दैठणा (ता. जि. परभणी) येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत काही दिवसापूर्वी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, बॅंकेचे सायरन वाजल्यामुळे चोरटे पळुन गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखेने तपास करत गोविंद कठाळू काळे (रा. नळद ता. गंगाखेड) यास शीताफीने सापळा रचून धसाडी येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता परभणी जिल्ह्यातील त्याने केलेल्या गुन्ह्याची व सोबत आसलेल्या साथीदारांविषयी माहिती मिळाली. 

दोघांना घेतले लोणावळ्यातून ताब्यात
त्यानुसार पोलिसांनी टोळीची माहीती घेतली. त्या टोळीत संतोष आनंद याला उडीसा (ह. मु.बांद्रा) येथील झोपडपट्टी, विकास ऊर्फ बंटी सादरसिंग मिना मध्यप्रदेश (ह. मुं. कोपर खैरणा नालासोपारा) येथील झोपडपट्टी, मंगेश उर्फ योगेश रूपलाल नागले (रा.गणेशपार ता.मोरशी जि अमरावती ह. मूं. नालासोपारा ईस्ट) यांचा समावेश असल्याची माहीती समोर आली. गोविंद काळे हा देखील मुंबईला कोपर खैरणा येथे राहात असून या आरोपींनी दैठणा, गंगगाखेड, लोणार, सोलापुर या ठिकाणी गुन्हे केल्याचे समोर आले. यातील दोन आरोपींना लोणावळा येथुन ताब्यात घेउन व एकास मुंबई नालासोपारा येथुन ताब्यात घेतले.

आरोपींनी दिली कबुली
 या आरोपींनी दैठणा यथील बॅंक फोडल्याचे तसेच गंगाखेड, सोलापुर, लोणावळा व इतर ठिकाणी चोरी, घरफोडी केल्याचे कबुली दिली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेल्या दोन मोटर सायकल व घरफोडी करण्याचे साहित्य जप्त करुन आरोपींना दैठणा पोलिसात हजर केले आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक रागसुधा आर, पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारोखी, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, राम काळे, राजेश आगाशे, संजय शेळके यांनी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

UPI MDR Charges: PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

संतूर मॉम! रश्मी अनपट आहे आठ वर्षाच्या मुलाची आई; शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले- याची बायको आली की तू...

Latest Marathi News Live Update: यूपीआयवरील चार्जेस दिवाळीनंतर लागू होणार

SCROLL FOR NEXT