file photo
file photo 
मराठवाडा

खळबळजनक...नांदेडच्या ‘या’ डॉक्टरला खंडणीची धमकी 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : भागवताच्या कार्यक्रमात जावून तुमचे पाहूणे आले आहेत असे म्हणून बाजूला नेऊन अनोळखी दोघांनी एका डॉक्टरला पैशाची मागणी केली. तुमच्याकडे अमाप पैसा आहे. पैसा व सोने जेवढे काही आहे तेवढे आम्हाला द्या नसता परिणामाला सामोरे जा अशी धमकी दिल्याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार वाजेगाव (ता. नांदेड) येथे रविवारी (ता. नऊ) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे पुन्हा व्यापारी व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. 

नांदेड शहरात मागील दोन वर्षापासून मोठे व्यापारी, व्यावसायीक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी यांना कुख्यात एका गुन्हेगाराची धमकी देऊन खंडणी मागण्याचे प्रकार सुरू होते. त्या प्रकरणात नांदेड पोलिसांनी एका गुंडाला चकमकीत ठार केले होते. त्यानंतर काही खंडणीबहाद्दराला अटक करून त्या टोळीवर महाराष्‍ट्र सामुहीक गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करून अनेकजण सध्या हर्सुल कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. खंडणीचे प्रकार त्यानंतर काही काळ थांबले होते. मात्र सोमवारी (ता. १०) दुपारी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळटेकडी परिसरात एका फळ व्यापाऱ्याला पिस्तुलचा धाक दाखवून ३० लाखाची बॅग लंपास केला होती. त्या घटनेचा पोलिसांकडून  तपास सुरू आहे. 

डॉक्टरला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार

याघटनेच्या अगोदर अनोळखी दोघांनी एका डॉक्टरला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वाजेगाव परिसरात राहणारे एक डॉक्टर याच परिसरातील भागवताच्या कार्यक्रमात उपस्थित होते. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्याजवळ अनोळखी एकाने जावून तुमचे पाहूणे आले आहेत असे भासवून त्यांना थोडे बाजूला घेतले. यावेळी तेथे थांबलेल्या दुसऱ्याने त्या डॉक्टरला धमकावले. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा 

आमच्या बॉसने सांगितले की तुमच्याकडील पैसे व सोन्याचे दागिणे जेवढे असतील तेवढे द्या. तुमच्याकडे अमाप पैसा असल्याचे आमच्या बॉसला कुणीतरी सांगितले. ते तुम्ही आम्हाला द्या नसता एक डॉक्टर व गोविंद कोकुलवार यांना जे आता भोगावे लागत आहे. त्याच प्रकारे तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. तशी वेळ तुमच्यावर येउ नये व पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या जिवीतास धोका राहील. तुम्ही आमच्या मागणीची पुर्तता करून ठेवा अशी धमकी देऊन हे दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. यानंतर भयभीत झालेल्या त्या डॉक्टरने नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनोळखी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार गजानन खैरे करत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT