beed sakal
मराठवाडा

Beed News : ‘एमपीएससी’त शुभमची चौदावी रँक

शुभम पाचंग्रीकरने राज्यसेवा परीक्षेत चौदावा क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे, आता त्याचे उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार बनण्याची स्वप्न साकार होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड : शुभम पाचंग्रीकरने राज्यसेवा परीक्षेत चौदावा क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे, आता त्याचे उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार बनण्याची स्वप्न साकार होणार आहे. याआधी त्याने राज्यसेवा परीक्षेच्या पाच परीक्षेत घवघवीत यश संपादन केले होते. त्यामध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी तो राज्यात पहिला आला होता. तर, 2021 मध्ये तो टेक्निकल असिस्टंट म्हणून राज्यात प्रथम आला होता.

तसेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर रँक 67 वी त्याची होती. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याची रँक अकरावी होती. आता तो पाचव्यांदा एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाला आहे. या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे शालेय शिक्षण चंपावती माध्यमिक विद्यालय (बीड) येथे झाले असून, पदवी शिक्षण अभियांत्रिक शाखेत (छत्रपती संभाजीनगर) येथे झाले आहे.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शुभमने राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासात सातत्य ठेवत नोकरीच्या मागे न लागता जिद्दीने अभ्यास करत यश संपादन केले आहे.

नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेच्या निकालात त्याने 14 वा रँक प्राप्त केला असून, त्याचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न लवकर साकार होणार असून, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे

— प्रताप पाचंग्रीकर, (वडील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT