हिंगोली हिंगोली
मराठवाडा

Hingoli Rain: सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; बारा दरवाजे उघडले

धरणाचे आज एकुण चौदा दरवाज्या पैकी बारा दरवाजे सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आले आहेत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. दोन दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गुरुवारी (ता. नऊ) सकाळी साडेनऊ वाजता धरणाचे बारा दरवाजे उघडले असून पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता गुरुवारी सकाळी धरणाचे बारा दरवाजे उघडून पुर्णा नदीपात्रात ७४२.१३ क्यूसेक्स विसर्ग केला जात आहे. बुधवारी दुपारी देखील बारा दरवाजे उघडले होते.

धरणाचे आज एकूण चौदा दरवाज्या पैकी बारा दरवाजे सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आले आहेत. यामध्ये एक, दोन, तीन, चार, सहा, सात, आठ, नऊ, अकरा, बारा, तेरा व चौदा हे दरवाजे उघडून पाण्याचा पुर्णा नदी पात्रता विसर्ग केला जात आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. सिद्धेश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पुर्णा नदी, औंढा, वसमत तालुक्यातील काही गावांसह परभणी जिल्ह्याकडे जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT