IRCTC
IRCTCIRCTC

IRCTC Share: आयआरसीटीसीच्या शेअर्सची कमाल, गुंतवणुकदार मालामाल

आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 132 टक्क्यांची वाढ झाली आहे

-शिल्पा गुजर

मुंबई: आयआरसीटीसीचे (IRCTC) शेअर्स गुंतवणूकदारांसाठी ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेअर्सने आतापर्यंत10 पटीपेक्षा जास्त वाढझाल्याचे दिसून आले. आयआरसीटीसीच्या (IRCTC) शेअर्सचाआयपीओ आल्यानंतर14 ऑक्टोबर 2019 रोजी 728.60 रुपयांवर बंद झाला. 7 सप्टेंबरला बीएसईवर(BSE)आयआरसीटीसीचे शेअर्स 3,288.65 वर बंद झाले. त्याच दिवशी या स्टॉकने इंट्राडेमध्ये (Intra Day) 3,305 रुपयांचा विक्रमी उच्चांकही प्रस्थापित केला होता. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीत सेन्सेक्समध्ये (Sensex) 53 टक्के आणि बीएसई मिडकॅप निर्देशांकात (BSE MidCap Index)77 टक्के वाढ झाली.

आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 132 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे या काळात सेन्सेक्स 22 टक्के आणि मिडकॅप निर्देशांक 36 टक्के वाढला. हा स्टॉक 2021 च्या मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 7 सप्टेंबरला आयआरसीटीसीची मार्केट कॅप व्हॅल्यू 52,618.40 कोटी रुपयांवर पोहोचली. मार्केट कॅपच्याबाबतीत आयआरसीटीसी भारतातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी एक झाली आहे. ऑगस्टच्या मध्यात कंसोलिडेशननंतर 24 ऑगस्टपासून या स्टॉकमध्ये पुन्हा एकदा तेजी बघायला मिळाली. तेव्हापासून आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये29 टक्के वाढ झाली आहे.

IRCTC
पोस्ट देणार गृहकर्ज, LIC हाऊसिंग फायनान्ससोबत केला करार

अर्थव्यवस्थेची घडी पुर्वपदावर आल्याने, लॉकडाऊन शिथिल झाल्याने, मालमत्ता चलनीकरण योजना (Asset Monitisation Plan), हॉटेल व्यवसायातील विस्तार योजना आणि रेल्वे ई-तिकीट, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स या सगळ्यांमुळे आयआरसीटीसीच्या शेअर्सना मदत मिळत आहे. शिवाय, नुकत्याच झालेल्या स्टॉक स्प्लिटमुळे हा स्टॉक चांगलाच वधारला आहे.

IRCTC
व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 40 टक्क्यांनी वाढ

पुढे काय होण्याची शक्यता?

आयआरसीटीसी हा स्टॉक येत्या 6-8 महिन्यांत 5000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे बाजारातील दिग्गजांचे म्हणणे आहे. तांत्रिक दृष्टीकोनातून हा स्टॉक पोल इन अ फ्लॅग पॅटर्नसारखा दिसत असल्याचे कॅपिटलव्हिया ग्लोबल रिसर्चचे (CapitalVia Global Research) गौरव गर्ग म्हणाले. या स्टॉकमधील तेजी पुढील 2-3 सत्रांमध्ये सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, यात कंसोलिडेशन बघायला मिळेल, पुढच्या 3 महिन्यांत या स्टॉकने 4000 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आणि त्यानंतरही तेजी सुरूच राहिली, तर 6 महिन्यांत 5000 च्या वर आयआरसीटीची स्टॉक पोहोचेल असेही गौरव गर्ग म्हणाले. कमी काळासाठी ज्यांनी या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले असतील त्यांनी आपला नफा वसून करावा,तसेच दिर्घ काळासाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांनी हा स्टॉक होल्ड करावा, जेणेकरुन यातून आणखी चांगला परतावा मिळेल असे बाजारातील दिग्गजांचे म्हणणे आहे.

(नोंद: क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com