Haji Shaikh Rustam
Haji Shaikh Rustam sakal
मराठवाडा

Sambhajinagar : अभिमानास्पद ! सिल्लोड एसटी स्टँडवर 102 वर्षांचे हाजीसाहेब अविरत चालवतात पाणपोई

सचिन चोबे

चाळीस वर्षांपासून कोणत्याही नागरिकांना काहीही न मागता पाणी वाटपाचे काम १०२ वर्षांचे हाजी शेख रुस्तुम आजही आनंदाने करतात.

सिल्लोड - पाण्यासारखे पुण्य नाही, पाणी वाटपासारखा धर्म नाही. या उक्तीप्रमाणे मागील चाळीस वर्षांपासून अविरतपणे सिल्लोड येथील बसस्थानकावर पाणपोईद्वारे प्रवाशांना मोफत पाणी देण्याचे काम १०२ वर्षांचे हाजी शेख रुस्तुम आजही आनंदाने करीत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

चाळीस वर्षांपासून कोणत्याही नागरिकांना काहीही न मागता पाणी वाटपाचे काम ते करतात. देईल ते घ्यायचे नाहीतर पाणी वाटपाचे काम करीत रहायचे हा त्यांचा नित्यक्रम आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून बसस्थानकावर उन्हाळ्यातील चार महिने शहरातील व्यापारी परिवाराच्या वतीने पाणपोई चालविण्यात येते. या कार्यासाठी त्यांनी चाळीस वर्षांपासून शेख रूस्तम यांच्या हाती पाण्याचा पेला दिला. त्यांच्याकडून जो मोबदला मिळेल त्याची वाच्यता कोठेही होत नाही. पाणपोईची व्यवस्था करणारे, तटस्थ उभे राहत पाणी पाजणारे आणि याठिकाणी पाण्याचा पुरवठा करणारे हे सर्व हा नित्यनेम काटेकोरपणे पाळत आहे. यासाठी एसटी आगार प्रशासनाचे मोलाचे सहकार्य नेहमीच मिळत आहे.

शहरातील माधवदास कटारिया यांनी चाळीस वर्षांपूर्वी पाणपोई उपक्रमाची बसस्थानकावर सुरूवात केली. त्यांच्या दुसऱ्या पिढीने देखिल हा उपक्रम गाजावाजा न करिता सुरू ठेवला आहे. याठिकाणी नाममात्र शुल्कामध्ये शहरातील शेख अकिल बडेमिया हे टॅंकरद्वारे पाण्याचा पुरवठा नियमित करतात. शहरातील ईदगाह रस्त्यावरील परिसरात राहणारे हाजी शेख रूस्तम वयाच्या साठ वर्षांपासून हे काम करतात. वयाच्या १०२ व्या वर्षी देखिल त्यांची हे सेवा सुरूच आहे. महाशिवरात्रीपासून जून महिन्यापर्यंत उन्हाळ्यामध्ये पाणी वाटपाचे काम चार महिने सुरू राहते. बसस्थानकावरील पाणपोई व हाजी शेख रूस्तम हे समीकरणच बनले आहे.

रमजान महिन्यातही सेवा

रमजान महिना सुरू आहे. उन्हाळ्याच्या झळा देखिल बसण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच रमजान महिन्याचे उपवास सुरू आहे. अशामध्ये देखिल हाजी शेख रूस्तम पाणी वाटपाचे काम करीत आहे. उपवास असला म्हणून काय झाले पाणी पाजण्याचे काम मी सुरू ठेवणार असे ते आनंदाने सांगत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT