2Sakal_20News_11 
मराठवाडा

नववर्षात मराठवाड्यातील ४४ अव्वल कारकुन, मंडळ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट

मधुकर कांबळे

औरंगाबाद : विभागातील अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील ४४ अव्वल कारकुन आणि मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदावर पदोन्नती मिळाली आहे.  याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेशात म्हटले आहे, की औरंगाबाद विभागातील अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातीतल कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार गट ब या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्तपदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील रिक्तपदांवर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.

या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असल्याचे याबाबातच्या आदेशात म्हटले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या अधिकारी वगळता इतरांना पदोन्नतीच्या जागेवर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश शासनादेशात दिले आहेत. नियमित पदोन्नती कोट्यातुन अव्वल कारकुन संवर्गातील १५ जणांना तसेच ८ मंडळ अधिकाऱ्यांना खुल्या संवर्गातून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच सरळसेवा कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने १४ अव्वल कारकुन तर ७ मंडळ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT