नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

महत्वाचे म्हणजे अकरावीत शिकत असलेला आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली

कन्नड (औरंगाबाद): सध्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत आहेत. पण आता जाधव राजकारणात सक्रिय होत असल्याचे मुलगा आदित्य जाधवने सांगितले आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्यने ही माहिती दिली. आता कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. 

महत्वाचे म्हणजे अकरावीत शिकत असलेला आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत आई विरुध्द मुलगा अशी लढत ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला भेटणार आहे.

धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्कार; पीडितेची आत्महत्या

आदित्य जाधवने ऐन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत उडी घेऊन हर्षवर्धन जाधव सक्रिय होणार असल्याची घोषणा करून वडील अटकेत असताना स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. या निमित्ताने आदित्यने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विषेश म्हणजे स्वतःच्या आई विरुध्द पॅनेल उभा करत आदित्यने राजकारणार एंट्री केली आहे.

पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आदित्यने समर्पक उत्तरे दिली. तर पिशोर येथील ग्रामपंचायत मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा प्रचार करणार असाल तर तेथे आई संजना ताई जाधव यांचेही पँनल असणार यावर आदित्य ने सांगितले की संविधानाने सर्वाना निवडणुकीत उभा राहण्याचा हक्क दिलेला आहे त्यामुळे कुणी निवडणुकीला सामोरे जावे हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे. संविधानाने त्यांना तो दिलेला हक्क असून त्या त्यांचा हक्क बजावत असतील तर त्यात वावगे काय? असे समर्पक उत्तर दिले शिवाय वडील राजकारणात असताना शेतकऱ्यांसाठी लढत असताना, त्यांना न्याय मिळवून देताना मोठ्या नामांकित नेत्यांसोबत त्यांचे वाद झाले आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी परत एकदा ते राजकारणात सक्रिय होत असल्याचे सांगितले.

'हर्षवर्धन जाधवांचे राजकारणात 'कमबॅक', ग्रामपंचायतच्या निकालातून देणार उत्तर'

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की नामांकित लोक, नेते, म्हणजे नेमके कोण? पत्रकारांचा रोख आजोबा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होता मात्र आदित्यने याही प्रश्नास पत्रकारांचा व्होरा ओळखून वादाचा मुद्दा टाळून समर्पक उत्तर दिले. शिवाय निवडणुकांच्या निकलातूनच आता विरोधकांना उत्तर देणार असल्याचेही यावेळी आदित्य जाधव यांनी ठासून सांगितले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harshvardhan and aditya jadhav against sanjana jadhav