file photo 
मराठवाडा

शाळेत चक्क ‘टिकटॉक’ चे धडे !

अनिल शेटे

गंगाखेड (जि.परभणी) : एरवी आपण शिक्षण किंवा शाळेत सुविधा नसल्यामुळे शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याची बातमी ऐकतो. परंतू, विद्यार्थांना चक्क ‘टिकटॉक’वर व्हिडिओ करण्यास भाग पाडणाऱ्या शिक्षक दाम्पत्याला धडा शिकविण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्याची घटना धारखेड (ता. गंगाखेड जि.परभणी) येथे शनिवारी (ता.२२) घडली. दरम्यान, शाळेला शनिवारी केंद्र प्रमुखांनी भेट देवून पाहणी केली.

धारखेड (ता.गंगाखेड, जि.परभणी) येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत गावातील व आजू - बाजूच्या छोट्या गावातील मुले शिक्षणसाठी येतात. या शाळेत शिक्षक म्हणून शेख इमाम व त्यांच्या पत्नी याच शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शेख दाम्पत्याला सोशल मिडियाची चांगलीच भुरळ पडलेली आहे. त्यामुळे की काय या शिक्षकांनी चक्क शाळेतील विद्यार्थांनाच टिकटॉक व्हिडिओवर नाचण्यास व व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडले. जेव्हा या सर्व प्रकाराची माहिती शाळे बाहेर आली तेव्हा मात्र, ग्रामस्थामध्ये गोंधळ उडाला. संतंप्त झालेल्या गावकऱ्यांनी शनिवारी शाळेला कुलूपच लावले. या वेळी गावातील महिलादेखील मोठ्यासंख्येने हजर होत्या. शाळेतील मुली व मुलाना एकत्रीत गाण्यावर नाचण्यास सांगून त्याचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी उपस्थित ग्रामस्थांनी शाळेसमोर मुलांना बसवून त्यांच्याकडून रोज घडत असलेल्या प्रकार केंद्र प्रमुख श्री.वाडेवाले यांच्यासमोर तोंडी वदवून घेतला.


हेही वाचा - स्मशानभूमीत व्यायाम करा आणि मरणाला जरा थांबवा

...तर विद्यार्थांना वर्गाबाहेर उभे करतात
विद्यार्थांने टिकटॉकचा व्हिडिओ तयार करण्यास विरोध केला तर अश्या विद्यार्थांस वर्गाबाहेर उभे करून त्यास शिक्षा देतात असा आरोप विद्यार्थांनी केला आहे. हे शिक्षक दाम्पत्य वारंवार रजा घेत असतात. त्यांना कुणी या रजेबद्दल बोलेल तर त्यांच्याशी हुज्जत घालतात असाही आरोप ग्रामस्थांनी केंद्र प्रमुखांसमोर व्यक्त केला.



वारंवार तक्रारी प्राप्त
या शिक्षक दाम्पत्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विनापरवानगी रजा घेणे, इतर शिक्षकांशी हुज्जत घालणे अश्या प्रकारच्या तक्रारी आहेत. विद्यार्थांचा व्हिडिओ हा प्रकार ही गंभीर आहे.
- श्री.वाडेवाले, केंद्र प्रमुख


वरिष्ठांनी चौकशी करावी
या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करावी अन्यथा आम्ही शाळा सुरु ठेवणार नाहीत. तातडीने या गंभीर प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी.
- अंकुश बोबडे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT