Jalna Accident News esakal
मराठवाडा

Jalna Accident | जालन्यात ट्रक-रिक्षाची जोरात धडक, दोन जण जागीच ठार

एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ज्ञानेश्वर पुंगळे

राजुर (जि.जालना) : भोकरदन-राजूर रस्त्यावरील बाणेगाव पाटीवर बुधवारी (ता.२७) सकाळी साडेसहा वाजता ट्रक व अवजड रिक्षाची समोरासमोर जोरात धडक झाली. यामधे रिक्षामधील दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कुरडया व घरगुती साहित्य घेऊन येणारा रिक्षा (एमएच १९ सीवाय १०९१) हा राजूरकडे जात होता. तसेच जालन्याहून भोकरदनकडे (Bhokardan) जाणारा ट्रक (एमएच ४० एके ५१५६) या दोन्ही वाहनांची सकाळी साडेसहा वाजता राजुरपासून जवळ असणाऱ्या बाणेगाव पाटीवर जोरात धडक झाली. (Two People Died In Accident In Jalna)

रिक्षामध्ये समोर तिघे जण बसले होते. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले. त्यांची नावे समजली नसून एकजण गंभीर जखमी झाला असुन त्याला जालना (Jalna) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला आहे. घटनास्थळी राजुर पोलीस चौकीचे गणेश मांटे, सिद्धू साबळे व भोकरदन पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी संपूर्ण कुरडया व घरगुती सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT