
महाराष्ट्र,बंगालमध्ये सर्वाधिक व्हॅट; इंधन दरवाढीवरून बैठकीतच मोदींचा टोला
दिल्ली : पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करण्यावरुन महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकरी कर कमी केले आहे. राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन मोदी यांनी या प्रसंगी महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल यासह इतर बिगर भाजप शासित राज्यांना केले आहे. त्यांनी आज बुधवारी (ता.२७) मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ऑनलाईन संवाद साधला. काही राज्यांनी कर कमी केले. मात्र इतरांनी ते केले नाही. त्यामुळे या राज्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव अधिक आहेत. (PM Narendra Modi Criticize Maharashtra Government For Not Cutting Taxes On Petrol-Diesel)
हेही वाचा: माल वाहतूक खर्चात २५ टक्के वाढ येत्या १५ एप्रिलपासून अंमलबजावणी ः डिझेल, पेट्रोल दरवाढीचा परिणाम
ज्या राज्याने करामध्ये कपात केली आहे, त्यांचे नुकसान होते. काही राज्यांनी आपल्या नागरिकांसाठी करामध्ये कपात केली आहे. त्याचा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. कर्नाटक आणि गुजरात सोडून इतर राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) कर कमी केलेले नाहीत, असे मोदी यांनी बैठकीत बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यांना आठवण करुन दिली आहे.
हेही वाचा: भारतात खूप काही महागाई नाही - निर्मला सीतारमन
तुमच्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी प्रार्थना करित आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांनी पेट्रोल-डिझेल कर कपातीबाबत काहीच केलेले नसल्याचे मोदी म्हणाले. देश हितासाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये जे करणे आवश्यक होते. ते आता करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जागतिक संकटाच्या काळात सहकारी संघराज्यात टीम म्हणून काम करायला हवे, असे आवाहन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यांना केले आहे.
या वेळी मोदींनी मुंबई आणि कोलकाता या शहरांचे नावं घेऊन येथे पेट्रोल-डिझेलचे दर अधिक असल्याचे सांगितले. त्यांनी विविध करांची आकडेवारी वाचून दाखवली आहे. इंधनावरील व्हॅट महाराष्ट्र आणि बंगालमध्ये सर्वाधिक व्हॅट आहे. इंधन दरवाढीवरून थेट बैठकीतच मोदींनी या दोन राज्यांना टोला लगावला आहे.
Web Title: Pm Narendra Modi Criticize Maharashtra Government For Not Cutting Taxes On Petrol Diesel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..