Tamjil-and-Minaj
Tamjil-and-Minaj 
मराठवाडा

नाल्यातील पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

अनिल राऊत

वडोदबाजार (जि.औरंगाबाद) - वडोद बाजार (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद ) येथील शाळेतून शौचास म्हणून गेलेल्या दोन मुलांचा मेळाच्या नाल्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री उघड़किस आली.

येथील सरस्वती भुवन हायस्कूल मधील इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणारे तमजील शेख मोबिन (वय 14 वर्ष ) व मिनाज शेख अनीस (वय 13, दोघे रा. वड़ोद बाजार) हे दोन मित्र दुपारी तीन वाजेच्या सुमारास वर्गात दप्तर ठेवून शौचासाठी जातो म्हणून बाहेर पडले. ते शाळा सुटेपर्यंत ते न परतल्याने तमजीलचा लहान भाऊ दोघांचे दप्तर घेवून घरी गेला. रात्र होवू लागली तरी मुले घरी न आल्याने मुलांच्या नातलगांनी शोध सुरु केला. रात्री दहा वाजेच्या सुमारास गिरजा नदीला जोडणाऱ्या मेळा नाल्याच्या काठावर एकाची चप्पल दिसल्याने नाल्याच्या पाण्यात रात्री शोधकार्य सुरु केले. मध्यरात्री साडेबारा वाजन्याच्या सुमारास तमजील याचा मृत्युदेह सापडला. शुक्रवारी (ता.2) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले असता आठ वाजता मिनाज याचाही मृतदेह सापडला.

गिरजा नदी पात्राला जोडून असलेल्या या नाल्याचे यंदा खोलीकरण करण्यात आले आहे. पुढे गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविलेले असल्याने नात्यात  मोठ्या प्रमाणात पाणी तुबलेले होते. त्यामुळे शोधकार्यात वेळ लागला.

 वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी आकरा वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत व डॉ. सय्यद उम्मर यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

माजी सरपंच शेख रज्जाक यांच्या माहिती वरुण वडोद बाजार पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Jadhav: परभणीचे खासदार संजय जाधव यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा; राज्यपालांना लिहिलं सविस्तर पत्र

Shardul Thakur Surgery: शार्दुल ठाकूरवर झाली सर्जरी, पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कधी करणार पुनरागमन?

Sharad Pawar Video: राजकीय आखाड्यानंतर... शरद पवारांच्या 'त्या' व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Viral Video: चंद्राबाबूंच्या शपथविधीवेळी स्टेजवरच राडा! अमित शाहांनी माजी राज्यपालांना...; नेमकं काय घडलं पाहा

USA vs IND T20 WC 2024 Live : युएसएविरूद्ध भाराताने नाणेफेक जिंकली; रोहितने केला का संघात बदल?

SCROLL FOR NEXT