Pradipkumar Joshi & Dashrathsinh Rajput Sakal
मराठवाडा

Fraud News : मेहुण्याच्या घरावर साल्याचा डल्ला! कंपनीच्या वसुलीचे ४० लाख परस्पर लांबवले

वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापूर शिवारात असलेल्या स्टील व पाईप कंपनीत काम करणाऱ्याकडे कंपनीच्या मालकांनी ४० लाख रुपयांची रक्कम दिली असता ती त्याने घरात ठेवली होती.

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर - वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापूर शिवारात असलेल्या स्टील व पाईप कंपनीत काम करणाऱ्याकडे कंपनीच्या मालकांनी ४० लाख रुपयांची रक्कम दिली असता ती त्याने घरात ठेवली होती. त्यानंतर त्याच्या साल्यानेच मेहुण्याच्या घरात डल्ला मारून रक्कम लंपास केली. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोन आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्या ताब्यातून ४० लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेला ऐवज जप्त केला.

मुकेश गोयल यांच्या साजापूर शिवारातील स्टील व पाईप कंपनीत श्रीवगतसिंह हिरसिंह राजपूत (४२) काम करतात. ते कुटुंबासह गुरुदक्षिणा अपार्टमेंट बिल्डींग नंबर २, सिडको महानगर -१,तिसगाव येथे राहतात. २० मे २०२३ ते २७ मे २०२३ या कालावधीत कंपनीच्या मालकांनी कंपनीचे वसुलीचे ४० लाख रुपये श्रीवगतसिंह हिरसिंह राजपूत यांच्याकडे दिले होते. ही रक्कम त्यांनी घरी एका बॅगेत ठेवली होती.

दरम्यान २८ मे २०२३ रोजी सकाळी राजपुत व त्याची पत्नी असे भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या घरी आलेला त्याचा साला दशरथसिंह कांतीसिंह राजपूत याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चाळीस लाख रुपये रक्कम घेऊन पळून गेला. याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह पोलीस पथक नेमून वेळोवेळी मार्गदर्शन करुन गुन्ह्याचा पाठपुरावा केला.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरुन मध्यप्रदेश पोलीसांच्या मदतीने पोलीस ठाणे दलौदा (जि.मन्दसौर) येथून गुन्ह्यातील आरोपी दशरथसिंह राजपूत (२६) रा.रामचौक तहसिल राणीवाडा जि.जालौर, राजस्थान व प्रदिपकुमार जगदिश जोशी(२६) रा.गरबा चौक,ता.राणीवाडा जि.जालौर यांना अटक केली.

त्यांच्याकडून चोरलेल्या ४० लाख रुपयांपैकी ३५लाख ८४ हजार रुपये,१ लाख रुपये किंमतीची कार, ३ लाख रुपये सोन्याचे अंगठी व चैन तसेच पाच मोबाईल असा एकुण ४० लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, पोलीस अंमलदार सुरेश कचे, अविनाश ढगे, सूरज अग्रवाल, हनुमान ठोके यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT