पार्डी (ता. वाशी) : नवदाम्पत्य काजल व कपिल.
पार्डी (ता. वाशी) : नवदाम्पत्य काजल व कपिल.  
मराठवाडा

कोरोनामुळे साखर पुड्यातच उरकला विवाह

नेताजी नलवडे

वाशी (जि. उस्मानाबाद) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी तालुक्यातील पार्डी येथे १६ एप्रिल रोजी होणारा विवाह समारंभ रद्द करुन शनिवारी (ता. १४) साखरपुड्याच्या कार्यक्रमात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये विवाह उरकण्यात आला. यासाठी उद्योजक बबन चौगुले, सरपंच हिराबाई चौगुले व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे वधू व वराच्या कुटुबियांचे परिसरात कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की पार्डी येथील ईश्वर महादेव चौगुले यांचा मुलगा कपिल व गावातील अशोक मुरलीधर वाघमारे याच्या मुलीचा विवाह काही दिवसांपूर्वी रितीरिवाजाप्रमाणे ठरला होता. १६ एप्रिल रोजी विवाह नियोजित करण्यात आला होता. पार्डी येथेच मंडप, बँडबाजा बुकींगसह पै पाहुण्यांना लग्नपत्रिका वाटप करुन नातेवाइकांना निमंत्रण देऊन हा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन वर व वधुकडील कुटुंबियांकडून करण्यात आले होते.

मात्र जगभरात पसरलेल्या व भारतामध्येही प्रामुख्याने महाराष्ट्रातही प्रवेश केलेल्या कोरोना विषाणूंचा प्रसार व अपप्रचार रोखण्यासंदर्भात सर्वच स्तरावर प्रयत्न होत असताना विविध उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतलेले आहे.

आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना ठेऊन वधू व वराकडील मंडळीनी कोरोना विषाणुच्या प्रसाराबाबत गर्दी न करण्याच्या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लग्नात होणारी गर्दी टाळण्यासाठी मोजक्यात नातेवाईकांच्या उपस्थितीत शनिवारी साखरपुड्यातच विवाह उरकून घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता साखरपुड्यातच हा विवाह सोहळा उरकण्यात आला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT