mumbai sakal
मुंबई

दिवा-शीळ रस्ता रुंदीकरणात बाधित होणारे 320 कुटुंब बसले साखळी उपोषणाला

दिवा जंक्शन या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - दिवा (Diva) शीळ रोडवरील दिवा (Diva) स्टेशन ते दिवा जंक्शन(Diva Junction) सर्कल या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम ठाणे महापालिकेच्या (Thane Municiple) वतीने करण्यात येत आहे. या रुंदीकरणात 22 इमारतीतील 320 हुन अधिक कुटुंब (Family) बाधित होत आहेत. या रस्त्यावरील फेरीवाले व बेकायदा पार्किंग (Parking) हटविल्यास रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता नाही.

तसेच बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन कसे केले जाणार आहे ही भूमिका पालिकेने स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलन कर्त्यांची असून दिवा शीळ रोडवर बाधित होणारे कुटुंब बुधवार पासून साखळी उपोषणाला बसले आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 45 मी डीपी रस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता पहिलेच खूप रुंद आहे. येथील अनधिकृत पार्किंग, फेरीवाले व अनधिकृत रिक्षा थांबा हटविल्यास मोठा आणि प्रशस्त रस्ता उपलब्ध होईल. मागील 3 वर्षांपासून सदरच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे असे सांगितले जात आहे. ठाणे महानगर पालिकेतर्फे रहिवाशांना दुसरं कारण सांगून खोट्यापद्धतीने बायोमेट्रिक करून घेण्यात आले आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी न बोलावता बेकायदेशीर सुनावणीच्या नावाने इमारतींमधील एक-दोन रहिवाशांना बोलावून खोली खाली करण्यासाठी धमकावले जाते. सुनावणी झाल्यानंतर कोणताही आदेश पारित न करता बेकायदेशीर नोटीस बजावून इमारत खाली करण्यासाठी सांगितले जात असल्याचे येथील रहिवासी उषा पगार, पंचम ढगे, संजय पाटील, अशोक राऊत यांनी सांगितले.

पांडुरंग भोईर यांची जमीन देखील या रस्त्यात बाधित होत असून 24 मी रस्ता रुंदीकरणाचा अद्याप त्यांना मोबदला मिळालेला नाही याविषयी त्यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना देखील पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे निलेश पाटील, आदेश भगत, सचिन भोईर, रोहिदास मुंडे, विजय भोईर हे देखील या रहिवाशांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत.

दिवा शहराचे जुने आणि सुजाण रहिवाशी म्हणून आम्ही महापालिकेची विकासाची भूमिका आम्ही स्वीकारू. पण ठाणे महानगर पालिकेने देखील आम्हा सर्व रहिवाशांना विचारात आणि विश्वासात घेतले पाहिजे. आमच्या मागण्यांचा जोपर्यत पालिका प्रशासन विचार करत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहील असे रहिवाशांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

घटस्फोट पाहिले, नाती तुटताना पाहिली... लग्नाआधीच ऋषी सक्सेनासोबत लिव्ह-इनमध्ये का राहते ईशा केसकर? स्वतः सांगितलं कारण

MPSC Exam Update: एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना; अधिकृत निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT