स्मार्टफोनने देखील करता येते प्रोफेशनल फोटोग्राफी, वापरुन पाहा या ट्रिक्स

know photography hacks for smartphone Marathi article
know photography hacks for smartphone Marathi article

बऱ्याच जणांना स्वतःचे फोटो काढून घेणे पसंद असते, तर बऱ्याच जणांना फोटो काढयाला आवडतात. आजकाल इंटरनेट आणि सोशल मिडीयावर तुम्ही काढलेल्या चांगल्या फोटोंना लोक दाद देखील देतात. सण, समारंभांच्या ठिकाणी किंवा कुठे फिरायला गेल्यावर भरभरून फोटो काढले जातात. आजकाल कुठलाही प्रसंग फोटो काढल्याखेरीज संपत नाही. पण चांगली दर्जेदार फोटोग्राफी सगळ्यांना जमते असे नाही.

तुमच्याकडे कॅमेरा नसेल तर चांगले फोटो काढताच येणार नाहीत असे काही नाही. महागडा कॅमेरा नसतानाही तुम्हाला प्रोफेशनल फोटोग्राफी करणे शक्य आहे. स्मार्टफोन वापरुन तुम्हाला देखील प्रोफेशनल फोटोग्राफर्सप्रमाणे चांगले फोटो काढयाचे असतील तर तुम्हाला त्यासाठी कोणावर अवलंबून राहाण्याची गरज नाही. या सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही देखील सुंदर फोटो काढू शकाल.

1. लेन्सवर पाण्याचा वापर

कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाण्याचा थेंब ठेवून फोटो घेणे ही सर्रास वापरण्यात येणारी ट्रिक आहे. तुम्ही देखील लहानसा पाण्याचा थेंब मोबाईल कॅमेऱ्यावर ठेवून फोटो घेण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करु शकता. पाण्याचा थेंब तुम्हाला मायक्रो लेन्सचा प्रभाव देईल. जेणे करुन अगदी जवळून एखाद्या गोष्टीचा फोटो काढता येईल. यासाठी खूपच लहान थेंब मोबाईलच्या बॅक कॅमेऱ्यावर ठेवा, तसेच एकावेळी तीन-चार फोटो काढले जातील अशी सेटिंग  चालू ठेवा. जेणेकरुन पाणी लवकरच कॅमेऱ्यावरुन काढून टाकता येईल. 

2. सनग्लासेसचा वापर

जर एखाद्या जागी प्रकाश व्यवस्थित असेल तर फोटो काढण्यासाठी सनग्लासेस हे फिल्टरप्रमाणे वापरता येतील. ही ट्रिक वापरताना अशा प्रकारचे फोटो काढताना जास्त जाड काच नसलेला डबल-टोन सनग्लासेस वापरा ज्यामुळे तुम्हाला फोटोत टिंट इफेक्ट मिळेल. 

3. फ्लॅशचा क्रिएटिव्ह वापर

ही ट्रिक  प्रोफेशनल फोटोग्राफर बऱ्याचदा वापरताना दिसतात. एखाद्या ठिकाणी फोटोघेण्यासाठी उजेड खूपच कमी असेल तर या ट्रिकचा वापर केला जातो. फ्लॅश वापरताना एखाद्या वस्तूच्या मागून प्लॅश लाईट टाकला जातो जेणेकरुन त्या वस्तूची सावली देखील फोटोमध्ये  दिसेल. 

4 वॅसलीनचा वापर

कॅमेरा लेन्सवर पाण्याचा थेंब वापरुण ज्या पध्दतीने फोटो काढले जातात, अगदी त्याच प्रकारे वॅसलीन देखील वापरले जाऊ शकते. यासाठी थोडेसे वॅसलीन कॅमेरा लेंसला चोळावे लागते, जेणेकरुन फोटोला सॉफ्ट फोकस लुक मिळेल. परफेक्ट ब्लर इफेक्टसाठी ही ट्रिक बेस्ट आहे. ही ट्रीक वापरताना वॅसलीन खूप जास्त होणार नाही याची काळजी घ्या. 

दुर्बिणीचा वापर

ही पध्दत बॅकग्राऊंडसह फोटो काढायचा असतो अशा वेळी वापरण्यात येते. या ट्रिकमध्ये फोटो काढताना झूम करण्याएवजी लेन्ससमोर दुर्बिण ठेवण्यात येते. ही ट्रिक वापरताना दुर्बिण आणि कॅमेरा लेन्स दोन्ही व्यवस्थित साफ केलेली असल्याची खात्री करुन घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com