Accident News Esakal
मुंबई

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी

अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Car Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. हा भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत झाला असून या अपघातात मुंबईतील दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघे गंभीर जखमी असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मिरा रोडच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (७१), रमेश मुसळे (५१), माधुरी मुसळे (५०) आणि रुचिक देसाई (३०) हे चौघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पालघरला (Palghar) कारने जात होते. सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कर थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातात जखमी झालेल्या २ जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे (५१) आणि रुचिक देसाई (३०) या दोघांचा मृत्यू झाला. तर अशोक मुसळे (७१) आणि माधुरी मुसळे (५०) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोड च्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माहेर की सासर? लग्नानंतर ओबीसी महिलेसाठी क्रिमी लेअर अट कशी ठरणार? सर्वोच्च न्यायालय सोडवणार गुंता

EMRS Girls Cricket Camp : आदिवासी कन्या गाजविणार क्रिकेटचे मैदान; गडचिरोलीत ३५ विद्यार्थिनींसाठी खास क्रिकेट शिबिर

BJP Leader Kirit Somaiya : सोमय्या बॅक इन ॲक्शन! मंत्री मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दिलं खळबळजनक उत्तर

Lasalgaon News : कांदा प्रश्नी विधिमंडळ गाजणार! छगन भुजबळ आणि भास्कर भगरे मैदानात; तोडगा निघणार का?

Gadchiroli : भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू, महिन्याभरापूर्वी उधळलेला विजयी गुलाल

SCROLL FOR NEXT