मुंबई

Ambarnath News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ; आता पावसाळ्यात तुम्ही 'या' ठिकाणी जाऊ शकता फिरायला

सकाळ डिजिटल टीम

Amdarnath News : गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईकर सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडून फ्रेश होण्याचा आनंद घेऊ इच्छित आहेत. अश्यावेळी त्यांच्यासाठी मुंबई जवळचा अजून एक स्पॉट खुला झाला आहे.

अधिक माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर बंदी आदेश मागे घेण्यात आले असल्याची महिती समोर येत आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटक स्थळ पुन्हा सुरू होणार आहेत. पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्यात आली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते. मात्र आमदारांनी बंदी हटवण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.आता बंदी हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, बारवी नदी, चिखलोली, मलंगगड परिसर अशी अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं येत असतात.

का घातली होती बंदी

याठिकाणी दरवर्षी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेक अपघातही घडतात. यामुळे पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT