Sleep With Feet Facing South : दक्षिणेकडे पाय करून का झोपायचं नसतं? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं?

दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये असं आपण अनेकदा ऐकल असेल
Sleep With Feet Facing South
Sleep With Feet Facing Southesakal

Sleep With Feet Facing South : दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये असं आपण अनेकदा ऐकल असेल, विशेषत: आपले कुटुंबीय याचा आग्रह धरतात. त्याची पौराणिक आणि वास्तूशास्त्राशी संबंधित कारणे तुम्हाला माहित असतीलच, पण तुम्हाला हे माहित आहे का की, विज्ञान देखील हेच सांगतं की दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नसतं.

पौराणिक मान्यतांमध्ये दक्षिणेला यमाची दिशा मानण्यात आली आहे. दक्षिण दिशेला पाऊल ठेवल्याने यमराज क्रोधित होतात असे म्हणतात. झोपताना मस्तकाची दिशा उत्तरेकडे नसावी यावरही वास्तुशास्त्रात जोर देण्यात आला आहे. मानवाच्या पूर्वजांची ही गोष्ट विज्ञानालाही मान्य आहे, पण त्याचे प्रमाण पौराणिक आणि वास्तुशास्त्रापेक्षा वेगळ आहे. ते कसं ते समजून घेऊ.

Sleep With Feet Facing South
Parenting Tips : मुलं आणि किचन कसं करायचं Manage? चिंता सोडा या गोष्टी करा!

वैज्ञानिक कारणे काय आहेत

शास्त्रीयदृष्ट्या असं मानलं जातं की झोपताना आपल्या शरीरात चुंबकीय विद्युत ऊर्जा संचारते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आनंददायी आणि शांत झोप येते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून असं मानलं जातं की उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये चुंबकीय शक्ती आहे. जी दक्षिण ध्रुवापासून उत्तरेकडे वाहते. अशा स्थितीत जर कोणी दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर त्याच्या शरीरातील चुंबकीय ऊर्जा डोक्याकडे जाते.

Sleep With Feet Facing South
Baby Care Tips: लहान बाळाची नखं कापताना लक्षात या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा

त्याचा परिणाम काय होतो

जेव्हा चुंबकीय उर्जा पायापासून डोक्याकडे सरकते, आणि व्यक्ती सकाळी उठतो तेव्हा तो तणावाखाली असतो. कित्येक तास झोपूनही झोप पूर्ण झाली नाही असं त्याला वाटतं. मस्तकावर होत असल्याने थकवा जाणवतो, पण जर पाय उत्तर दिशेला असतील तर ही ऊर्जा पायातून निघून जाते, त्यामुळे लोक अधिक उत्साही आणि तणावमुक्त वाटतात.

Sleep With Feet Facing South
Vastu Tips  : Money Plant लावताना या चूका टाळल्या तरच श्रीमंत व्हाल, नाहीतर...

गंभीर आजार होऊ शकतात

विज्ञान असं म्हणतं की उत्तर ध्रुवाच्या चुंबकीय शक्तीमुळे लोकांना डोकेदुखी, झोपेची समस्या, तणाव आणि सतत चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com