मुंबई

Arthur Road Jail: जेलरला केलेल्या शिवीगाळ प्रकरणात आमदार रमेश कमदांचा सुटकेचा मार्ग सुकर, तक्रारदार झाला फितूर

अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असताना आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांना व डॉक्टरला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Aurthur Road Jail: अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असताना आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांना व डॉक्टरला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार व तत्कालीन कारागृह वैद्यकीय अधिकारी राहुल घुले यांनी आपली साक्ष फिरवली असून, त्यांना न्यायालयाने आज फितुर घोषित केले. मुख्य तक्रारदारच फितुर झाल्याने माजी आमदार कदम यांच्या सुटकेचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

माजी आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी बोगस लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा घोटाळा केला. याप्रकरणी रमेश कदमांसह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली; तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना याप्रकरणी पक्षातून निलंबितदेखील केले. (Latest Marathi News)

आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना कदम यांनी २४ फेब्रुवारी २०१६ रोजी तुरुंग अधीक्षक आणि डॉक्टरला शिवीगाळ केली होती. जे. जे. रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने शिवीगाळ केल्याचा कदम यांच्यावर आरोप असून, एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात या खटल्यावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

एफआयआर आणि तक्रारदाराने दिलेली साक्ष यात तफावत आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक भारत भोसले यांच्या सांगण्यावरून डॉक्टरांकडून तक्रार नोंदवण्यात आली होती. आता मात्र या तक्रारदाराने त्याची साक्ष बदलल्याचे निदर्शनास येताच या प्रकरणातील तत्कालीन पोलिस अधीक्षक भारत भोसले आणि सहवैद्यकीय अधिकारी यांना साक्षीदार म्हणून बोलावण्याचा निर्णय न्यायधीशांनी घेतला व या प्रकरणावरील सुनावणी १५ जानेवारीर्यंत तहकूब केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT