Water Tanker Sakal media
मुंबई

टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

कृष्णा जोशी

मुंबई : भिवंडी परीसरातील टंचाईग्रस्त (bhivandi water problem) कांबे गावाला (kambe village) गणेशोत्सवात (Ganpati Festival) रोज दहा टँकर भरून पाणी (tanker water) पुरविण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने (mva government) आज उच्च न्यायालयात (Mumbai high court) दिली. त्यामुळे या ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

या गावाला महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयासमोर आहे. तात्पुरता उपाय म्हणून 10 सप्टेंबरपासून दहा दिवस या गावाला रोज दहा टँकर पाणी दिले जात आहे, असे सरकारने आज न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सांगितले. या गावाला पाणीपुरवठा करण्याचा आदेश न्यायालयाने यापूर्वी दिला होता. गावात तीनशे अवैध पाणीजोडण्या असल्याने गावाला नियमित पाणी दिले जात नाही. गावाला मंजूर झालेल्या कोट्यानुसार आम्हाला पाणी द्यावे, असे ग्रामस्थांनी न्यायालयात सांगितले आहे. मुख्य जलवाहिनीवरील तीनशे अवैध जोडण्या काढून टाकव्यात. यातून फक्त राजकारण्यांना, बांधकाम व्यावसायिकांना, गोदामांना तसेच टँकर लॉबीला अवैध पाणीपुरवठा केला जातो, असेही त्यांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांना नियमित पाणी न देणे ही मूलभूत हक्कांची पायमल्ली आहे, असे मत खंडपीठाने यापूर्वीच व्यक्त केले होते. या अवैध जोडण्या काढून ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा सरकार करेल, त्याचा कृती आराखडाही सादर केला जाईल, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या आधीच्या भूमिकेबद्दल माफी मागितली. याचिकेतील मुद्यांवर त्वरेने तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या समस्येवरील कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन त्वरेने केले जाईल. मात्र यासाठी निश्चित कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले. याचिकेवर पुढील सुनावणी महिनाअखेरीस होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

SCROLL FOR NEXT