esakal | परिवहन मंत्र्यांच्या गुगलीने म्हाडा अधिकारी गोंधळात
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parab

परिवहन मंत्र्यांच्या गुगलीने म्हाडा अधिकारी गोंधळात

sakal_logo
By
तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर (bandra office) तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी (lokayukta) दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने (mhada) ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयावर कारवाई करणार आहे. मात्र हे कार्यालय आपले नसल्याची गुगली परिवहन मंत्र्यांनी टाकली आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला नोटीस (notice) देण्यासाठी म्हाडा अधिकारी गोंधळात पडले असून यावर विधी विभागाचा (legal affairs) सल्ला घेण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: सिंधुदुर्ग उप परिसराला मधू दंडवते यांचे नाव द्या, सिनेट सदस्यांची मागणी

परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधी नगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हंटले होते. त्याप्रमाणे झालेल्या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार म्हाडा या बांधकामावर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयाला नोटीस बजावणार आहे.

परंतु परब यांनी हे अनधिकृत कार्यालय माझ्या नावे नसल्याचे पत्र म्हाडाला दिले आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला नोटीस कशी द्यायची, याबाबत वांद्रे विभागातील अधिकारी विधी विभागाचे मत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधी विभागाचे मत प्राप्त होताच अज्ञात व्यक्तीला नोटीस देण्यात येणार आहे. तसेच या बांधकामावर कारवाई तातडीने करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे 4 ऑक्टोबर रोजी या बांधकामावर कारवाई होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top