NIA esakal
मुंबई

मोठी बातमी! मुंबईत 6 ठिकाणी 'डी' कंपनीशी संबंधीतांच्या ठिकाणांवर NIAची छापेमारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बनावट भारतीय चलन प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयएने गुरूवारी सकाळी मुंबईत 6 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एनआयएने डी कंपनीशी संबंधित आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकले. तेथून तपास यंत्रणेने अनेक साहित्य जप्त केले आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोव्हेंबर 2021 मध्ये 2.98 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आरोपी रियाज आणि नसीर या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन असून डी कंपनीची नेमकी भूमिका तपासात आढळून आली होती. (Latest Marathi News)

एनआयए मुंबईच्या पथकाने बुधवारी या प्रकरणातील आरोपी आणि संशयितांच्या घरे आणि कार्यालयांसह विविध मालमत्तांवर अनेक छापे टाकले.

छाप्यात जप्ती

एनआयएने छापेमारीत अनेक साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये धारदार शस्त्रे, डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रांचा समावेश आहे. एनआयएने सांगितले की छाप्यांदरम्यान जप्त केलेल्या वस्तूंवरून हे स्पष्ट होते की बनावट नोटांच्या रॅकेटचा डी-कंपनीशी थेट संबंध होता. हे संपूर्ण प्रकरण भारतातील 2000 च्या बनावट नोटांशी संबंधित आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली होती. (Breaking Marathi News)

थोडक्यात प्रकरण

देशातील बनावट चलन जारी केल्याप्रकरणी ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्यात 18 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रियाझ आणि नसीर या आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले दोघेही मुंबईचे रहिवासी असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एनआयएने या प्रकरणातील चालू तपासाचा एक भाग म्हणून आरोपी आणि संशयितांच्या अनेक मालमत्तांवर, मुख्यतः घरे आणि कार्यालयांवर छापे टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT