Shiv Sena Case: "जे झालं ते झालं"; सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल कोश्यारी बोलले

...तर ठाकरेंनी राजीनामा दिला असता का? असंही कोश्यारींनी म्हटलं आहे.
Shiv Sena Case: "जे झालं ते झालं"; सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल कोश्यारी बोलले
sakal

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज निकाल दिला. पण कोर्टानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकांवर ताशेरे ओढले. कोर्टाच्या या निर्णयावर कोश्यारींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (What is done can not been done Former Gov Bhagat Singh Koshyari spoke on SC verdict)

Shiv Sena Case: "जे झालं ते झालं"; सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल कोश्यारी बोलले
Shiv Sena Case: सत्ता संघर्षाच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; नैतिकता अन् भाजप हे...

कोश्यारी म्हणाले, ""मी न्यायाधिशांपेक्षा जास्त विद्वान नाही पण श्रेष्ठ नाटककार शेक्सपिअरनं म्हटलंय की, What is done can not been done अर्थात 'जो हो चुका, वो हो चुका' मी आता राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. आता हे समीक्षकांचं, वकिलांचं काम आहे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची व्याख्या करावी.

Shiv Sena Case: "जे झालं ते झालं"; सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल कोश्यारी बोलले
Shiv Sena Case: शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब! फडणविसांनी केलं SCच्या निकालाचं विश्लेषण

मला असं वाटतं की, मी आता या प्रकरणांमध्ये पडू नये. मी आजवर जे काही केलं आहे, जितकं मला संसदीय पद्धतीचं ज्ञान आणि अनुभव आहे त्या आधारे मी माझा निर्णय घेतला होता. जर माझा निर्णय योग्य नसता तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला असता का? याचा अर्थ हाच आहे की माझा निर्णय योग्य होता. कारण ते बहुमतात नव्हते. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळं हा विषय तर तिथेच संपला होता.

Shiv Sena Case: "जे झालं ते झालं"; सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल कोश्यारी बोलले
Shiv Sena Case: "पक्षादेश माझ्या शिवसेनेचेचा चालणार! आता..."; निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं निकाल देताना तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे कायद्याला धरुन नव्हते अशा शब्दांत कोर्टानं आपलं मत व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com