मुंबई

मुंबईकरांची वाट लावणारा अर्थसंकल्प; भाजप नेते भातखळकरांची टीका

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्पावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. बीएमसीचा अर्थसंकल्प म्हणजे बोगस बजेट असल्याचं त्यांनी म्हटलं.

मुंबई - BMC चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. आतापर्यंतचा इतिहासातील हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.७० टक्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता अर्थसंकल्पावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. बीएमसीचा अर्थसंकल्प म्हणजे बोगस बजेट असल्याचं त्यांनी म्हटलं. (BMC Budget 2022)

अतुल भातखळकर म्हणाले की, शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीचा अर्थसंकल्प म्हणजे बोगस बजेट, भांडवली खर्च ४० टक्केही करता आला नाही. कोस्टल रोडवर खर्च केला, कॅगने ताशेरे मारलेत तरी विनाकारण पेमेंट केल्याचंही भातखळकर यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार याच्या नावाखाली मराठी शाळा विकण्याचा घाट शिवसेनेनं घातल्याचं भातखळकरांनी म्हटलं. तोंडाला पानं पुसणारा आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असल्याचा घणाघात भातखळकरांनी केला.

निवडणुका आहेत म्हणून कर वाढवला नाही असं सांगण्यात आलं पण कोरोनामुळे कर वाढवूच शकला नाहीत. आम्ही दबाव टाकल्यानं कर तसाच ठेवलात. खरं तर कमी करण्याची आवश्यकता होती. सर्वसामान्य मुंबईकराची वाट लावणारा अर्थसंकल्प असल्याचंही भातखळकर म्हणाले.

शिक्षण विभागाचा ३३७० कोटींचा अर्थसंकल्प

शिक्षण विभागाचा 2022-23 या वर्षाचा 3 हजार 370 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.या अर्थसंकल्पात मैदानांचा विकास,क्रिडा संकुल तयार करणे यासाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT