corona railway
corona railway 
मुंबई

कोरोनाच्या नावाखाली मध्य रेल्वेचा 94 लाखांचा खर्च; माहिती अधिकारातून उघड

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रुग्णालयात प्राथमिक सोईसुविधा उपलब्ध करण्यासाठी तब्बल 94 लाखांचा खर्च केला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाबाधीत रूग्णांवर पश्चिम रेल्वेच्या जनजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू असतांना मध्य रेल्वेकडून 94 लाखांचा खर्च करण्याचे कारण काय? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ता अजय बोस यांनी उपस्थित केला आहे. 

रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयाला कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी निवडले आहे. त्यामध्ये मध्य, पश्चिम रेल्वेच्या कोरोना संशयित कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात असून तिथेच उपचारसुद्धा सुरू आहे; मात्र सुरूवातीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या रुग्णालयामध्ये आपात्कालीन सेवा तयार करून ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर मध्य रेल्वे मार्गांवरील रुग्णालयांमध्येही  कोरोना वार्डाची तयारी करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये लागणारे व्हेंटिलेटर, अत्याधुनिक मशिन आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्ट्रीने लागणारे साहित्य सुद्धा महागडे आहे. यासाठी हा खर्च केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

मात्र, जगजीवनराम रुग्णालयातच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असताना आणि त्याच ठिकाणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा उपचार सुरू असताना दोन महिन्यात मध्ये रेल्वेने 94 लाख रूपये कशासाठी खर्च केले आहे. त्याचा तपशिलवार माहितीसुद्धा माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितली असल्याचे अजय बोस यांनी सांगितले.
 

मध्य रेल्वे प्रशासनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. त्यामध्ये दोन महिन्यात 94 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती मिळाली. मात्र, एकीकडे कोरोनाच्या रुग्णांवर जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू असतांना मध्य रेल्वेचा 94 लाखांचा खर्च करण्याचे कारण काय  
- अजय बोस, माहिती अधिकारी कार्यकर्ते 

कोरोनाच्या काळात सर्व प्रकारच्या प्राथमीक सुविधा रेल्वेच्या रुग्णालयात उपलब्ध करून द्याव्याच लागतात. अशा परिस्थितीत सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. कुठल्याही प्रकारे वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांची कोरोनाविरुद्धची लढाई कमजोर करू नका.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT