खोपोली : लोकमान्य टिळक वाचनालयाच्‍या कार्यक्रमात विचार व्यक्त करताना भार्गवी चिरमुले. 
मुंबई

पुस्तक म्‍हणजे फॅशन नाही

सकाळ वृत्तसेवा

खोपोली (बातमीदार) : ग्रामीण भागातील नागरिकांना वाचनासाठी वेळ आहे; मात्र शहरी भागामध्ये वेळेची मर्यादा खूप असते. काही व्यक्तींच्या घरामध्ये पुस्तकांची कपाटे भरलेली आहेत; मात्र त्यांचे वाचन न होता फक्त प्रदर्शन केले जाते. पुस्तक फॅशन म्हणून घरात न ठेवता त्यांचे वाचन करा, असे मत सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी चौक येथील लोकमान्य टिळक मोफत वाचनालयाच्या शताब्दी वर्ष पदार्पण सोहळ्यात केले. 

लोकमान्य टिळक मोफत वाचनालयाच्या शताब्दी वर्षाच्या महोत्सवाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री भार्गवी चिरमुले उपस्थित होत्या. समाज माध्यमांमुळे काही फायदे असले, तरी नुकसानही तेवढेच आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. आज लेखणी कमी झाली आहे. सुंदर अक्षरांच्या स्पर्धा शाळेमध्ये होण्याची गरज आहे. प्रत्येकांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, असे मत भार्गवी यांनी उपस्थित महिलांना उद्देशून व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री जोशी, कार्यक्रमाची व्यवस्था व व्यवस्थापन ग्रंथपाल अभिजीत चौधरी, राजेंद्र ठाकरे, डॉ. अर्पणा वाळिंबे, अश्विनी भोईर यांनी केले. या वेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश वत्सराज, सेक्रेटरी सतीश आंबावणे, विश्वस्त श्रीकृष्ण चंबावडे, ग्रंथपाल अभिजित चौधरी, सदस्य मुरलीधर साखरे, अशोक चौधरी, रजनीकांत शहा, कार्यकारी सदस्या रंजना साखरे, काशिनाथ खंडागळे, अजिंक्‍य चौधरी, राजन चौधरी, गणेश कदम, राजेश आंबावणे, शताब्दी वर्षाचे अध्यक्ष समिती लोकमान्य टिळक मोफत वाचनालय डॉ. श्रीनिवास वाळिंबे आदी उपस्थित होते.

गारेगार प्रवास करायचा आहे का? वाशी ते घाटकोपर प्रवास गारेगार! 

‘वाचाल तर वाचाल’ या उक्‍तीप्रमाणे वाचन संस्कृतीची ज्योत सातत्याने पेटवत ठेवली पाहिजे. वाचन केल्यास आपल्याला अवांतर ज्ञान मिळते. त्यातूनच माणूस सर्वांगीण सुंदर बनतो.
- भार्गवी चिरमुले, सिनेअभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT